Gangapur Police station, Nashik police latest news, Police drunk liquer in police chowki News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

चौकीत दारू पार्टी करणाऱ्या पोलिसांची नागरिकांनी उतरवली झींग!

उपायुक्तांनी मध्यरात्री तपासणी करून चार पोलिसांवर कारवाई केली.

Sampat Devgire

नाशिक : शहरातील (Nashik) डी. के. नगर पोलिस चौकीत काल रात्री पोलिसांची (Police) मद्य पार्टी रंगली. नागरिकांच्या हे निर्दशनास आले. त्यांनी त्याचे व्हीडीओ चित्रण केले. यावेळी पळून जाणाऱ्या एका पोलिसांस पकडून त्याचे चित्रण करीत नागरिकांनी त्याला चौकीत डांबले. वरिष्ठ अधिकारी आल्यावर पोलिसांवर कारवाई करण्यात आली. मध्यरात्री दोन तास हा गोंधळ सुरु होता. (Police drunk liquer in police chowki)

बिहार व कायदा सुव्यवस्थेत पिछाडीवर असलेल्या राज्यांनाही लाजवेल अशी ही घटना आहे. त्यात नाशिकने त्या सगळ्यांना मागे टाकले. त्यामुळे शीस्त व प्रशासकीय कारवाईत नावलौकीक असलेले पोलिस आयुक्त दीपक पांडे याबाबत काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Nashik police latest news)

याबाबतची माहिती अशी की, काल रात्री अकराला गंगापूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील डी. के. नगर भागात परिसरातील नागरिकांना टवाळखोर युवक त्रास देत होते. त्यामुळे तो पोलिस चौकीत तक्रार करण्यास गेला होता. तो तक्रार करण्यास गेला असता, त्याला चार पोलिसचौकीतच दारू पीत बसलेले आढळले. त्याने त्यांना आपली तक्रार सांगून चौकशी केली. तेव्हा या पोलिसांना राग आला. त्यांनी त्याला चौकीत बोलावून दिवे बंद करून मारहाण केली. त्यानंतर हा युवक बाहरे आला असता त्या भागातील नागरिक देखील आले होते. त्यांनी मोबाईलद्वारे दारु पिणाऱ्या या पोलिसांचे चित्रण केले.

त्यावरून वाद वाढत गेला. तेव्हा एका पोलिसाने तेथून पळ काढला. तेव्हा काही नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला रोखले. त्याचे व्हीडीओ चित्रण करून त्याला पुन्हा चौकीत आणले. याचवेळी नागरिकांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कळवले. त्यामुळे काही वेळाने पोलिस उपायुक्त दिपाली खन्ना तेथे दाखल झाल्या. त्यानंतर अन्य वरिष्ठ अधिकारी आले. हा प्रकार लक्षात आल्यावर या पोलिसांची चांगलीच कान उघडणी केली. थेत पोलिस चौकीतच कर्मचारी दारू पित असल्याचे आढळल्याने तो चर्चेचा विषय झाला.

दरम्यान दिपाली खन्ना यांच्या सुचनेनंतर या पोलिसांची पहाटे जिल्हा शासकीय रुग्णालयात या चार पोलिसांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल आल्यावर तो पोलिस आयुक्तांना सादर केला जाणार आहे. सकाळी याबाबत माहिती मिळाल्यावर खळबळ उडाली आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT