Mukesh Shahane, BJP corporator Sarkaranama
उत्तर महाराष्ट्र

पंकजा मुंडेंचा कार्यक्रम भाजपच्या शहाणेंना भोवला; पोलिसांत गुन्हा दाखल

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता.

Sampat Devgire

सिडको : विनापरवानगी ड्रोन उडविणे, रस्त्यात स्टेज उभारणे, वाहतुकीला अडचण निर्माण होईल अशा रस्त्यात खुर्च्या ठेवणे व गर्दी जमविल्याप्रकरणी भाजप नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) यांच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाकाली चौकात आय लव्ह न्यू नाशिक व छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडिअम महाकाली चौक नामकरण फलकाचे माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्‌घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. शहरात कोरोनाच्या बंधनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या कार्यक्रमास परवानगी नाकारली होती. हा कार्यक्रमाबाबत पोलिसांनी संयोजकांना कोरोनाची बंधेन व सध्याच्या परिस्थितीविषयी पूर्वकल्पना दिली होती.

कार्यक्रमाच्या आयोजनात अंबड पोलिसांनी नगरसेवक मुकेश शहाणे यांना नोटीस देऊन परवानगी नाकारली होती. तरीदेखील नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रमाचे आयोजन केले. वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा रीतीने स्टेज उभारून व नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्या रस्त्यावर ठेवून रस्ता अडवला. कार्यक्रमास शासकीय परवानगी न घेता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले. तसेच नागरिकांची गर्दी जमवून कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT