Girish Mahajan sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

गिरीश महाजनांच्या विरोधात फास आवळला : टेंपोभर कागदपत्रे ताब्यात!

जळगावच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील वादाप्रकरणी पोलिसांनी कागदपत्रे ताब्यात घेतली

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील वादाच्या प्रकरणी कोथरुड (पुणे) पोलिसांच्या पथकाने जळगावात केलेल्या तपासणीत तब्बल एक टेम्पो भरून कागदपत्रे जप्त करून पुण्याला (pune) नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. दरम्यान, या प्रकरणामुळे माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह यातील संशयितांच्या अडचणीत वाढ होणार आहे. (Police seized documents in connection with dispute at educational institution in Jalgaon)

मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वादाप्रकरणी ॲड विजय भास्करराव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोथरुड पोलिस ठाण्यात आमदार गिरीश महाजन, नीलेश भोईटे यांच्यासह २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात चौकशीसाठी पुणे पोलिसांचे ५० जणांचे पथक जळगावात दोन दिवसांपासून ठाण मांडून होेते. जळगावात पाच संशयितांकडे दोन दिवस कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांनी सोमवारी महापालिकेत तसेच जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जावून चौकशी करत काही कागदपत्रे हस्तगत केली आहेत. गाडीभर कागदपत्रांमध्ये नेमके काय दडलंय, हा चौकशीचा भाग असल्याने अधिकाऱ्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. या मात्र तपासणीमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या बाबत तक्रारदार विजय भास्कर पाटील यांनी सांगितले की, भरपूर आणि खूप मोठे पुरावे या छाप्यात मिळाले आहेत. भोईटे गटाच्या घरात मराठा विद्या प्रसारक संस्थेचे जुने रेकॉर्ड सापडल्याची माझी माहिती आहे. सगळं रेकॉर्ड घेऊन हे पथक आज पुणे येथे रवाना झाले आहे. पोलिसांनी आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, संस्था स्थापनेपासूनचे रेकॉर्ड तानाजी भोईटे यांच्या घरात सापडले असल्याची आपल्याला माहिती आहे. मी जी तक्रार दिली आहे, त्याला पूरक असा पुरावा तपासणीत मिळाला आहे.

भोईटे गटाने हा प्रकार माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या पाठिंब्याने केला आहे. या पुराव्याच्या आधारावर आपण त्या त्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करणार आहोत. या प्रकरणी पोलिसांनी गिरीश महाजन यांच्यासह २९ लोकांना मोकाचा गुन्हा लावून अटक करावी, अशी आपली मागणी असल्याचे विजय पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT