Dr Ketki Patil  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ketaki Patil News : राजकीय वारसा घरातूनच, पण डॉ. केतकी पाटलांची स्वबळावर राजकीय वाट !

Ketaki Patil Political Agenda : सद्या कोणत्याही पक्षात प्रवेश न करता त्यांनी जनसंपर्क सुरू केला आहे.

कैलास शिंदे

Jalgaon News : सामाजिक-राजकीय बाळकडू घरातूनच आई वडील यांच्याकडून मिळाले असले, तरी आपल्या स्वबळावर राजकीय कर्तृत्व निर्माण करण्याची तयारी डॉ. केतकी पाटील (Ketaki Patil) यांनी केली आहे. काँग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील व जिल्हा बँकेच्या माजी संचालक डॉ. वर्षा पाटील यांच्या त्या कन्या आहेत. (Latest Marathi News)

डॉ. केतकी पाटील यांचा आज वाढदिवस (९ ऑगस्ट) आहे. आई वडील यांच्या पाऊलावर पाऊल टाकून केतकी पाटील यांनी वैद्यकिय पदवी घेतली आहे. गोदावरी फाउंडेशन येथे त्या वैद्यकीय सेवेचे कार्य करीत आहेत. सामाजिक सेवा करीत असतानाच राजकीय क्षेत्रातही कर्तुत्व दाखविण्यासाठी त्या वाट शोधत आहेत.

वडील काँग्रेस पक्षाचे माजी खासदार, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असताना त्यांना काँग्रेस पक्षात सहज पदाधिकारी होणे शक्य आहे.परंतु त्यांनी आपल्या कार्य कर्तृत्वावर पुढे जाण्याचा निर्णय घेतला. सद्या कोणत्याही पक्षात प्रवेश न करता त्यांनी जनसंपर्क सुरू केला आहे. आपल्या वडिलांच्या रावेर लोकसभा मतदार संघाची त्यांना माहिती आहे. त्यांनी या मतदार संघात जनसंपर्क सुरू केला आहे . निवडणुकीची उमेदवारी आणि राजकीय रणांगण आद्याप दूर आहे, मात्र यासाठीचा अभ्यास मात्र त्यांनी सुरू केला आहे.

राजकारणातील राजकीय पक्षांचे गणित दररोज बदलत आहेत, त्यामुळे पक्षाची समीकरणेही बदलत आहेत. महायुती, महाविकास आघाडीत कोणता पक्ष भविष्यात असेल, हे आज तरी कोणता राजकीय जाणकरही सांगू शकत नाही, त्यामुळे डॉ. केतकी पाटील वडिलांप्रमाणेच काँग्रेस पक्षाचा वारसा चालवतील की, आपली वेगळी वाट शोधतील, हे मात्र आगामी काळात दिसून येईल. परंतु सामाजिक सेवा आणि जनसंपर्क यांच्या माध्यमातून त्यांची राजकीय वाट शोधत आहेत.एवढे मात्र नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT