Ahmednagar News : "राहुरीचे काहीच देणे-घेणे नसल्यांमध्ये एक नगरचे, तर दुसरे लोणीचे आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी राहुरीची बाजारपेठ उद्धवस्त केली. पण मी पण राहुरीचा आहे. इथली लोकं माझी आहेत आणि राहुरीच्या विकासासाठी सतत संघर्ष करण्याची तयारी आहे", असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगत मंत्री विखे आणि कर्डिले यांच्यासमोर आव्हान दिले.
आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर निशाणा साधला. शिवाजी कर्डिले गेली दहा वर्षे आमदार होते. त्यात पाच वर्षे सत्तेत होते.
तरी देखील राहुरीतील बसस्थानक, डेपो, ग्रामीण रुग्णालय, प्रशासकीय इमारतीचा प्रश्नावर काहीच केले नाही. पण महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अडीच वर्षात मंत्रीपद संभाळताना राहुरीतील विकास कामांवर काम केलं. आता याच कामाचे श्रेय घेण्याचा खटाटोप या दोघांनी सुरू केला असल्याचा आरोप प्राजक्त तनपुरे यांनी केला.
भाजपचे (BJP) विखे-कर्डिले यांना राहुरी तालुक्यांचे काही देणे-घेणे नाही. राहुरीची बाजरपेठे उद्धवस्त करण्याचा घाट या दोघांनी घातला आहे. शिवाजी कर्डिले यांनी दहा वर्षे आमदार असताना राहुरीसाठी काहीच केले नाही.
त्यामुळेच जनतेने त्यांना नाकारले. राहुरीतील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रश्नांवर ते दिशाभूल करत आहेत. हे रुग्णालयात मंजुरीसाठी किती बैठका झाल्या, याचे पुरावे प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दाखवले.
व्यापाऱ्यांवर दबाव आणला जाते, या आरोपावर राहुरीत कोणावर कसलाच दबाव नाही. राहुरीच्या व्यापाऱ्यांवर नगरच्या व्यापाऱ्यांसारखा दबाव निश्चितच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी येथे येऊन जातात, मी मंजूर करून घेतलेल्या विकास कामांचे उद्घाटन करून जातात, हे व्यापाऱ्यांनीच मला निदर्शनास आणून दिल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
शिवाजी कर्डिले यांना त्यांच्या नगर तालुक्याच्या भागातील पाइपलाइन मंजूर करून घेता आली नाही. नगर तालुक्यातील इमामपूर, मांजरसुंबा आदी गावांची पाइपलाइन मी मंजूर करून घेतली.
राहुरी बस स्थानकासाठी 17 कोटी मंजूर करून घेतले. सरकार गेले आणि काम थांबले. आता राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येताच राहुरी मतदारसंघातील थांबवलेल्या विकास कामांना वेग देणार असल्याचे आमदार तनपुरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.