Prakash Ambedkar, radhakrishn vikhe, Balasaheb Thorat  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prakash Ambedkar News : 'वंचित'च्या आंबेडकरांनी मंत्री विखेंमुळे थोरातांसाठी वाजवली 'वॉर्निंग घंटा'

Pradeep Pendhare

Nagar News : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी नगरमध्ये मोठा गौप्यस्फोट केला. भाजपचे स्टार प्रचारक राज्याचे महसूल तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे काँग्रेसच्या संपर्कात असूनही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना ही 'वॉर्निंग घंटा' आहे, असा गौप्यस्फोट करत थोरतांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतः अलर्ट राहावे, असा सूचक इशारा प्रकाश आंबेडकर यांनी सभेच्या सुरुवातीला दिला. यानंतरचा पुढचा गौप्यस्फोट हा करायचा आहे. परंतु तो पुण्यात करेल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पक्षाचे नगरमधील उमेदवाराच्या प्रचारासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज नगरमध्ये सभा झाली. सभेच्या सुरुवातीलाच प्रकाश आंबेडकर यांनी सध्याचे सत्ताधारी भाजप आणि बिगर सत्ताधारी काँग्रेस यांच्या घराणेशाहीवर तोफ डागली. सभेला किसन चव्हाण, दिशा पिंकी शेख, अरुण जाधव, दिलीप खेडकर उपस्थित होते. (Prakash Ambedkar News)

प्रकाश आंबेडकर यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना 'वॉर्निंग घंटा' दिली. भाजपचे स्टार प्रचारक राज्याचे महसूल तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या संपर्कात आहेत, हे प्रकाश आंबेडकर यांनी भर सभेत तारखानिहाय सांगितले. मंत्री विखे 28 मे 2023 ला सायंकाळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटले. यानंतर मल्लिकार्जुन खरगे सोलापूरहून बेंगलोरला 9 जून 2023 ला दुपारी तीन वाजता आले. तत्पूर्वी 8 जून 2023 ला मंत्री विखे यांनी खरगे यांच्याशी गुप्त बैठक केली, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

भारतीय जनता पक्षाची माणसे ही काँग्रेसला भेटत आहेत ही काँग्रेसला चांगली परिस्थिती आहे. सध्या महाराष्ट्रातील काँग्रेस ही नेते बाळासाहेब थोरात यांच्या हातात असल्याने थोरात यांना ही चांगली स्थिती आहे. परंतु मंत्री राधाकृष्ण विखे आता काँग्रेसच्या संपर्कात आल्याने कधी काय होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांना ही 'वॉर्निंग घंटा' आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

सत्ताधारी भाजप आणि बिगर सत्ताधारी काँग्रेस यांच्यामध्ये घराणेशाही आहेत. यामुळे यांच्यामध्ये सत्तेची स्पर्धा आहे. देशात बीजेपीची सत्ता पालट झाल्यास राधाकृष्ण विखे अगोदरच काँग्रेसला जाऊन भेटतात. अगोदरच सत्तेच्या रांगेत उभे राहतात. अगोदरच काँग्रेसच्या संपर्कात राहतात. राधाकृष्ण विखे हे अगोदर शिवसेनेमध्ये होते. मुळा प्रवरा संस्थेची चौकशी लागली त्यामुळे ते सेनेमध्ये गेले, असे आंबेडकर म्हणाले.

वीज कंपनी यांनी बुडवली. ग्राहकांचे पैसा गोळा केला. परंतु ते भरले गेले नाहीत. तो पैसा खाल्ला गेला. चौकशी होणार म्हणून सत्तेत जाऊन बसले. सत्तेत येणे-जाणे म्हणजे बुडण्याचा कारभार आहे. राधाकृष्ण विखे यांनी अगोदरच काँग्रेसच्या सत्तेच्या रांगेत उभे राहिल्याने बाळासाहेब थोरात यांच्या हाता-तोंडाशी आलेला सत्तेचा घास जाणार, असे दिसते आहे. नगर जिल्ह्यात नातेगोतावळ्याचे राजकारण सुरू आहे. नगर जिल्ह्याचा विकास पाहिजे असल्यास या गोतावळ्याच्या राजकारणापासून नगर जिल्ह्याला बाहेर काढले पाहिजे. तरच नगर जिल्ह्याचा विकास होईल, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT