Pratibha Patil  Sarkarnanama
उत्तर महाराष्ट्र

Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभाताईंच्या जमीनीवर भाजपच्या मंत्र्याचा कब्जा, कोर्टाच्या निकालानंतरही सोडली नाही

Pratibha Patil land dispute, Jaykumar Rawal BJP : पोलिस प्रशासनाने न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत आमची ३३ एकर जमीन सोडवून द्यावी अशी मागणी पाटील यांच्या कुटुंबीयांनी केली.

Ganesh Sonawane

Pratibha Patil land dispute : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कुटुंबाने भाजप नेते व महाराष्ट्र सरकारमधील पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात रावल आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. हा वाद माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि त्यांच्या भावांच्या संयुक्त मालमत्ता असलेल्या ३३ एकर शेती जमिनीचा आहे.

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे भाचे किशोरसिंग दिलीपसिंग पाटील यांनी शनिवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत घेत धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या जयकुमार रावल यांच्यावर गंभीर आरोप केले. शासनाने आमची जमीन मिळण्यासाठी सहकार्य करावे, न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत पोलिस प्रशासनाने दोंडाईचा (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील आमची ३३ एकर जमीन रावल परिवाराकडून परत मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी पत्रकारिषदेत केली.

किशोरसिंग पाटील पुढे म्हणाले की, दोंडाईचा येथील ही जमीन पूर्वी दिवंगत आजोबा नारायणसिंग पाटील यांच्या नावे होती. त्यानुसार त्यांचे वारसदार असलेल्या सहा मुलांची त्यात दिलीपसिंग पाटील, रणजितसिंग पाटील, प्रतिभाताई पाटील, गजेंद्रसिंग पाटील, बिलामसिंग पाटील, अरुणा गुणवंतसिंग पाटील यांची सातबाऱ्यावर नावे आहेत. परंतु, दोंडाईचा येथील रावल परिवारातील बितेहसिंग रावल यांच्यासह पाच जणांनी ही जमीन हडपली आहे. यासंदर्भात न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला असून तरीही जमीन त्यांनी सोडली नाही असा आरोप पाटील यांनी केला.

त्यानुसार बेलीफसह सनदशीर मार्गाने जमीन ताब्यात घेण्यासाठी गुरुवारी (ता. २५) वारसांसह आम्ही गेलो. परंतु यावेळी पोलिसांनी व काही जणांनी दमदाटी करत आमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. आम्हाला तिथून हुसकावून लावले. या संपूर्ण प्रकाराची गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी पाटील केली.

दरम्यान याप्रकरणी धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. संबंधित जमिनीचे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे प्रतिक्रिया देणे संयुक्तिक ठरणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT