<div class="paragraphs"><p>Jaykumar Rawal, BJP</p></div>

Jaykumar Rawal, BJP

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

तिघाडीचे बिघाडी सरकार आल्यानंतर विकास नव्हे तर लुटालूट सुरू आहे

Sampat Devgire

धुळे : राज्यात मागील सत्ताकाळात राज्याच्या व जनतेच्या विकासाचा विचार होत असे. मात्र राज्यात सध्याचे तिघाडीचे सरकार आल्यापासून केवळ लुटालूट सुरु आहे, असे प्रतिपादन भाजपचे (BJP) नेते, आमदार जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी केले.

आमदार रावल म्हणाले की, मागील सत्ताकाळात शिंदखेडा मतदारसंघातील गावागावांत विकासाची मोठी कामे करण्यात यशस्वी झालो होतो. संपूर्ण शिंदखेडा मतदारसंघात विकासाची गंगोत्री आणली. बुराई बारमाही योजना, सुलवाडे जामफळ योजना, हॅब्रिड ॲन्युइटी योजनेअंतर्गत रस्त्यांची कामे, रोहयोतून विहिरी, पर्यटन खात्याच्या माध्यमातून विविध कामे, शिंदखेडा-दोंडाईचा शहरात झालेली विकासकामे अशी अनेक विकासाची कामे झाली. मात्र २०१९ मध्ये राज्यात सत्तांतर झाल्यानंतर व तिघाडीचे बिघाडी सरकार आल्यानंतर कोणतेही विकासकामे होत नाहीत. सर्वत्र फक्त लुटालूट सुरू असल्याचा आरोप आमदार रावल यांनी केला.

शिंदखेडा मतदारसंघातील बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीना दहा लाखांचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार रविवारी ज्या गावांचा प्रस्ताव सादर झालेला होता त्या पहिल्या टप्प्यातील नऊ ग्रामपंचायतींना आमदार निधी देवून आश्वासनाची पूर्ती केली. दोंडाईचा येथील जनदरबार कार्यालयात हा कार्यक्रम झाला.

मतदारसंघातील झोतवाडे, टेमलाय, म्हळसर, धांदरणे, निशाणे, महाळपुर, दिवी, सतमाने व छावडी या प्रस्ताव आलेल्या ग्रामपंचायतींना तसेच आश्वासन दिलेल्या कर्ले, सुकवद, खर्दे, टाकरखेडा, अंजनविहिरे व कमखेडा या गावांना आमदार निधीचे पत्र आज दिले.

यावेळी शिंदखेडा पंचायत समितीचे माजी सभापती रघुवीर बागल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत ईशी, पंचायत समिती सदस्य रणजित गिरासे, माजी पंचायत समिती सदस्य दगाजी देवरे, अंजनविहिरचे सरपंच प्रभाकर पाटील, कर्लेचे सरपंच साहेबराव पवार, सुकवदचे सरपंच मुरलीधर पाटील, धांदरणेचे सरपंच रवींद्र गिरासे, टेमलाय सरपंच अण्णा मालचे, निशाणेचे सरपंच विनायक पाटील, गोकुळ बेडसे, चेतन पदमोर, दिवेश वारुडे यांच्यासह इतर गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT