Pankaja Munde | Pritam Munde
Pankaja Munde | Pritam Munde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Pritam Munde : पंकजाताईंबद्दल प्रीतम मुंडे थेटच बोलल्या, "घाव झेलायला ताई, अन्..."

सरकारनामा ब्यूरो

Pritam Munde : भाजपच्या नेत्या व खासदार प्रीतम मुंडे यांनी आपली बहिण व भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासंदर्भात एक वक्तव्य आत चर्चेत आले आहे.“सगळे घाव झेलायला पंकजा ताई आहे आणि मलाई खायला मी आहे,” असं वक्तव्य प्रीतम मुंडे यांनी केले आहे. नाशिक जिल्ह्यात विद्यार्थ्यांशी संवाद करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

प्रीतम मुंडे म्हणाल्या, “ सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा भाजपची घोषणा आहे. पण या घोषणेप्रमाणेप्रत्यक्ष ४० वर्षे राजकीय आयुष्य जगलेले गोपीनाथ मुंडेच आहेत. माझा जन्म मुंडेंच्या घरी झाला. माझ्याएवढं भाग्यवान कुणी नाही, असंच मला वाटतं. त्याहीपेक्षी माझं मोठं भाग्य म्हणजे , माझा जन्म पंकजा ताईंच्या पाठीवर झाला. कारण सगळे घाव झेलायला ताई आहे, आणि त्याची सगळी मलाई खायला मी आहे,” असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.

“समोर असलेले विद्यार्थी कदाचित म्हणतील की, तुम्ही हे काय सांगत आहात. आयुष्यात संघर्ष करायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे. गोपीनाथ मुंडेंच्या घरी जन्मलेल्या मुलींनी व्यासपीठावरून असे सांगू नये, असं काहीं विद्यार्थ्यांना वाटत असेल. पण इथल्या विद्यार्थ्यांना माझा प्रश्न आहे की, ठीकयं, आम्ही एक नशिबवान आहोत. पण गोपीनाथ मुंडेंचा कुठल्या मोठ्या माणसाच्या घरी जन्म झाला नव्हता. इथे कार्यक्रमात उपस्थित असलेले राहुल कराड यांचे वडील विश्वनाथ कराड यांचाही कुठल्या दिग्गज माणसाच्या घरी जन्मले नव्हते.”

“आता राहुल कराड व्हायचं की विश्वनाथ कराड याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. तुम्हाला प्रीतम मुंडे व्हायचं आहे की गोपीनाथ मुंडे व्हायचं हा तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. तुम्ही ठामपणे ठरवलं तर तुम्ही गोपीनाथ मुंडे किंवा विश्वनाथ कराड का होऊ शकत नाही का? अशी जिद्द मनात बाळगून ठेवा, तुम्ही ठरवलेल्या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल सुरू करा, तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल,” असंही प्रीतम मुंडे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT