Tomato trader absconds
Tomato trader absconds Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नाशिकच्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना ७० लाखांचा गंडा

Sampat Devgire

नाशिक : नव्या कृषी कायद्यांत सहकारी व नोंदणीकृत बाजार समित्यांएैवजी खाजगी कृषीमालाच्या विक्रीला प्रोत्साहन दिले आहे. या धोरणानुसार गिरणारे येथे टोमॅटोची खरेदी विक्री होत होती. त्यात एका व्यापाऱ्यांने चक्क ९० शेतकऱ्यांना ७० लाखांचा गंडा घातला. हा व्यापारी पसार झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. नव्या कृषी कायद्यांनुसार नाशिकला हा फटका बसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.

गिरणारे (ता. नाशिक) येथील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना लाखोचा गंडवून व्यापारी फरार झाल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र, संबधित व्यापारी येईल, या आशेवर शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार दिली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टोमॅटोला सध्या बरे भाव मिळत आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने बाजार समित्यांसह परिसरातील बाजार सक्रिय झाले आहेत. तालुक्यातील गिरणारे या मोठ्या गावातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करून एक व्यापारी गायब झाला असल्याची चर्चा आहे. कथित फसवणूक प्रकरणी परिसरातील वेगवेगळ्या सोशल मीडियावर उघडपणे चर्चा सुरू आहे. मात्र, नेमक्या किती रुपयांचा गंडा घातला याविषयी माहिती पुढे आलेली नाही. फसवणूक झालेल्यांपैकी काही शेतकऱ्यांना अजूनही व्यापारी परत येईल व पैसे देईल, अशी आशा आहे. त्यामुळे पोलिसांकडे अद्याप तक्रार दिलेली नाही.

गिरणारेत शेतकऱ्यांना गंडविल्याचा प्रकाराची चर्चा आहे. मात्र व्यापारी येईल, या भरवशावर असलेल्या शेतकऱ्यांकडून अद्याप तक्रार आलेली नाही. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यास त्वरित कारवाई केली जाईल.

-सारिका आहिरराव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नाशिक

शेतमाल बाजार समितीत आणा : पिंगळे

शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पिकविलेला शेतमाल काही व्यापारी गोड बोलून घेतात आणि लाखो रुपये बुडवून पळ काढतात. अशा प्रकारच्या घटना वाढीस लागल्या असून, नुकतीच गिरणारे मार्केटमध्ये अशाच प्रकारे एका शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे. अशी फसवणूक टाळायची असेल तर शेतकऱ्यांनी आपला शेतमाल नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतच आणावा, असे आवाहन सभापती देवीदास पिंगळे यांनी केले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातल्याने लॉकडाउन करण्यात आलेले होते. त्यातच नव्या कृषी कायद्यांचा आधार घेत अनेक नोंदणी नसलेले लोक शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच गावोगावी जाऊन खरेदी करतात. त्याची झळ बसली. अवकाळी पावसानेही शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थितीदेखील बिकट आहे. कष्टाने उभी केलेली बरीच पिके मातीत गेली होती.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT