NCP leader Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरावर आज येणार जनतेचा कौल!

पालकमंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजनांच्या नेतृत्वाची कसोटी

Sampat Devgire

कैलास शिंदे

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (NCP) एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षातून (BJP) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पक्षांतर गेल्यानंतर त्यांच्या घरच्या मतदार संघातील बोदवड नगरपंचायतीच्या मतदानाचा आज निकाल लागणार आहे. खडसे (Eknath Khadse) यांच्या पक्षांतरावर आज प्रथमच जनमताचा कौल मिळणार आहे. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाचीही कसोटी आजच्या निकालात दिसून येणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची बुधवारी मतमोजणी होणार आहे. बोदवड हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदार संघातील नगरपंचायत आहे.

या नगरपंचायतीवर खडसे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्यानंतर प्रथमच या नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. खडसे यांच्या पक्षानंतर जिल्ह्यातील ही पहिलीच सार्वजनिक निवडणूक आहे. त्यामुळे खडसे यांच्या पक्षांतरावर जनमताचा कौल मिळणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने या निवडणुकीत सर्वच्या सर्व १७ जागा लढविल्या आहेत. खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉग्रेसला बोदवड नगरपंचायतीत बहुमत मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. एकनाथ खडसे यांनीही या निवडणुकीसाठी स्वत: मैदानात उतरत प्रचार केला आहे, तर त्यांच्या कन्या ॲड. रोहिणी खडसे यांनीही यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. खऱ्या अर्थाने एकनाथ खडसे यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे.

पाटील, महाजन यांचीही कसोटी

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याही नेतृत्वाची ही कसोटी आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनंतर शिवसेनेने निवडणुकीत संपूर्ण १७ जागा लढविल्या आहेत. मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जिकिरीचे प्रयत्न केले आहेत, तर शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही या ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी जाहीर सभा घेतल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाचीही कसोटी आहे. तर भाजप नेते गिरीश महाजन यांच्याही नेतृत्वाची कसोटी आहे,खडसे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भाजपची सत्ता होती, मात्र खडसे यांनी पक्षातंर गेल्यानंतर भाजपला आपले अस्तित्व टिकविण्याचे मोठे आव्हान आहे.

गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली आता भाजप या ठिकाणी किती यश मिळविणार याकडही लक्ष आहे. तर कॉंग्रेसनेही या नगरपंचायतीत दहा जागा लढविल्या आहेत. त्यामुळे त्यांचे अस्तित्व किती राहणार याबाबतही उत्सुकता आहे. बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल हा जिल्ह्यातील राजकारणात बदल घडविणारा ठरणार आहे हे निश्‍चित.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT