Pune Nashik Semi High Speed Railway : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी, रेंगाळलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत चमत्काराची भाषा वापरली आहे.
विखे पाटील यांच्या या भाषेमुळे वेगळ्याच वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पुणे-नाशिक हा सरळ किती रेल्वे मार्ग रद्द होऊन ती रेल्वे शिर्डीकडे वळवण्यामागे मी कोणताही प्रयत्न केलेला नाही, हा सर्व साईबाबांचा चमत्कार आहे, असा दावा विखे पाटील यांनी केला आहे.
विखे पाटील म्हणाले, "शिर्डी (Shirdi) रेल्वेचा आम्हाला काहीही उपयोग नाही. या रेल्वेचा सर्वात जास्त फायदा साईभक्तांना होणार आहे. साईबाबांच्या आमच्यावर नेहमीच आशीर्वाद आहेत साईबाबांनीच ते ठरवलेले दिसते."
पुणे-नाशिक रेल्वे मार्गावर भाष्य करताना, असे असले तरी अजूनही वेळ गेलेली नाही. पुणे-नाशिक ही रेल्वे संगमनेरमार्गे व्हावी, याला आमचे प्राधान्य आहे. त्यातून मार्ग निघत नसेल, तर शिर्डीला रेल्वे द्या, अशीच आमची मागणी आहे, असेही सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी स्पष्ट केले.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे सरळ, संगमनेरमार्गे व्हावा यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी संघर्ष उभारला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, त्यांची कन्या जयाश्री थोरात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मध्यंतरी या रेल्वेमार्गासाठी पुणे-अहिल्यानगर-नाशिकमधील सर्वपक्षीय नेत्यांनी एकाचवेळी आंदोलन केले होते.
यातच नाशिक-शिर्डी रेल्वे मार्ग मंजूर झाला आहे. कोपरगाव येथे जमीन अधिग्रहणाची तयारी देखील सुरू झाली आहे. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आघाडी सरकारच्या काळापासून संघर्ष सुरू आहे. आता तर या मार्गाच्या मागून येऊन, नाशिक-शिर्डी रेल्वे देखील मंजूर झाली आहे. परंतु हा पुणे-नाशिक रेल्वेमार्ग राजकीय संघर्षात अडकताना दिसतो आहे.
नाशिक-शिर्डी रेल्वे मार्ग मंजूर होणे हा साईंचा चमत्कार असल्याचे सांगून विखे पाटील यांनी पुणे-नाशिक रेल्वे मार्ग संगमनेरमार्गे व्हावा यासाठी प्राधान्य असल्याचे सांगितले आहे. विखे पाटील यासाठी नेमका काय संघर्ष करतात, याकडे आता संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.