Sagar Moholkar Death Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sagar Moholkar Death : गोळ्यांनी शरीराची चाळण झालेल्या गुंड सागर मोहोळकरचा मृत्यू : नीलेश घायवळ गँगने केला 'गेम'

In a major gang rivalry incident, Jamkhed gangster Sagar Moholkar, who was injured in a firing allegedly by the Nilesh Ghaiwal gang in Pune, died during treatment : जामखेडमधील कुख्यात गुंड पैलवान सागर मोहोळकर याच्यावर पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याच्या गँगने गोळीबार केला होता.

Pradeep Pendhare

Sagar Moholkar News : जामखेडमधील कुख्यात गुंड पैलवान सागर मोहोळकर याचा सोमवारी (16 मार्च) उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ गँगने 13 दिवसांपूर्वी त्याच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर ससून रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी मोहोळकर याच्या मृत्यूच्या माहितीला दुजोरा दिला. त्याच्यावरील हल्ल्याच्या गुन्ह्यात आता वाढीव जीवे मारण्याचे कलम लागणार आहे.

सागर मोहोळकर याच्यावर बुधवारी (ता. 4) जामखेड शहरात हल्ला झाला होता. पुण्यातील (Pune) नीलेश घायवळ गँगने त्याच्यावर बेछुट गोळीबार केला होता. यात त्याच्या शरीरात सहा गोळ्या लागल्या होत्या. त्यातील दोन गोळ्या काढण्यात आल्या होत्या. परंतु चार गोळ्या त्याच्या शरीरात तशाच होत्या. शस्त्रक्रिया करण्याकरीता शरीराची तशी स्थिती नव्हती. यातच त्याचा ब्लड प्रेशर कमी-जास्त होत होते. यातूनच त्याला त्रास होऊ लागला अन् त्याच्या शरीराच्या हालचाली थांबल्या.

सागर मोहोळकर याच्यावर अगदी जवळून गोळाबार केल्या होता. त्याच्या तोंडात देखील गोळी मारण्यात आली होती. जखमी अवस्थेत सुरवातीला जामखेड, त्यानंतर अहिल्यानगर शहर आणि पुढे पुणे इथल्या ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 13 दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते.

जामखेडमधील एकाला अटक

सागर मोहोळकरवरली हल्ल्याप्रकरणी नीलेश घायवळ गँगमधील चौघांविरोधात गुन्हा नोंदवला होता. तसेच जामखेडमधील एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडसूत आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. उर्वरीत तिघे कोथरूडमधील असून, ते पसार आहेत. सागर मोहोळकर याच्यावर घायवळ गँगने पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचे समोर येत आहे.

घायवळच्या कानाशिलात लगावली होती

धाराशिव इथल्या भूम तालुक्यातील आंदरुड गावच्या यात्रेत गेल्यावर्षी 11 एप्रिल 2025मध्ये मोहोळकर याने घायवळ याच्या कानशि‍लात लगावली होती. यानंतर मोहोळकर चर्चेत आला होता. मोहोळकर याने पुढे, यावरून घायवळसमोर माफीनामा सादर केला. पण मोहोळकर याने गुन्हेगारी क्षेत्रात प्रसिद्ध मिळवण्यासाठी हा प्रकार केल्याचं समोर येताच, पाळत ठेवून घायवळ गँग हा काटा काढल्याचे सांगितले जात आहे.

राक्षसी ताकदीच्या सुरस कथा

स्थानिक गुन्हे शाखा पोलिस आणि जामखेड पोलिस हल्लेखोरांच्या तपासावर आहेत. पण या हल्ल्यानंतर मोहोळकर याच्या राक्षसी ताकदीच्या सुरस कथा चर्चेत होता. त्याच्या तोंडात गोळी लागली होती. त्याने ती हाताने काढण्याचा प्रयत्न करणे, पोलिस देखील त्याला पकडायचे म्हटल्यावर थरथराचे, त्याला पकडण्यासाठी दहा पेक्षा जास्त पोलिसांची गरज लागायची, अशी त्याच्याकडे ताकद होती.

मोहोळकरची गुन्हेगारी पार्श्वभूमी

तशी सागर मोहोळकर याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. त्याच्याविरोधात दोन खुनाच्या गुन्हे दाखल आहेत. पहिल्या खुनात तो तुरुंगात असताना, तिथं ही आणखी एक खून केला होता. मारामारी केल्याप्रकरणी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. नाशिक कारागृहातून तो महिन्याभरापूर्वी बाहेर आला होता. त्यातच हा त्याच्यावर हल्ला झाला अन् त्याचा आज त्या मृत्यू झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT