School of Artillery, Deolali Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Army Officer Crime: देवळालीच्या तोफखाना केंद्रात हेरगिरी, जवान चालवत होता चक्क पंजाबमध्ये ड्रग रॅकेट!

Punjab drug racket: School of artillery officer in drug racket and ISI-देवळाली तोफखान्यातील अधिकाऱ्याची पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ साठी हेरगिरी

Sampat Devgire

Devlali Artillery News: देवळालीच्या तोफखाना शाळेतील हेरगिरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पंजाब मध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज रॅकेटच्या तपासातून ही हेरगिरी उघडकीस आली. सध्या पंजाब पोलीस त्याची पाळीमुळे खोदून काढत आहेत.

भारतीय तोफखाना दलातील अतिशय संवेदनशील असलेल्या स्कूल ऑफ आर्टिलरी संदर्भात गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. येथील दोन अधिकाऱ्यांनी गोपनीय व संवेदनशील माहिती थेट पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ संस्थेला पुरविल्याचे उघड झाले. या संदर्भात पंजाब पोलिसांनी दोन लष्करी अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

देवळालीच्या तोफखाना शाळेत कार्यरत असलेल्या अमृतपाल सिंग आणि संदीप सिंग या दोघांचे हे रॅकेट उघड झाले आहे. त्यांच्याकडून तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहे. यामध्ये स्कूल ऑफ आर्टिलरीची संवेदनशील आणि गोपनीय माहिती व्हाट्सअप द्वारे ‘आयएसआय’ या गुप्तचर संस्थेला पुरविली जात होती.

या प्रकरणाची लिंक पंजाब मध्ये आढळली आहे. अमृतपाल सिंग हा अन्य एक गृहस्थ त्यांना मदत करीत होता. भटिंडा येथे संबंधित लष्करी अधिकारी वारंवार भेट देत असल्याचे आढळले होते.

देवळाली कार्यरत असताना हे अधिकारी नियमितपणे पंजाबला जात होते. तेथे ते हेरॉईन व अन्य अमली पदार्थांचे रॅकेट चालवत होते. पोलिसांच्या एक कारवाईत ५०० ग्रॅम अमली पदार्थ आणि दहा लाख रुपयांची रोकड सापडली होती. यातूनच संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत तपास गेला आणि त्यातून देवळालीच्या स्कूल पार्टीलारशी संबंधित हेरगिरी थेट पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ संस्थेपर्यंत कार्यरत असल्याचे उघड झाले.

लष्करी अधिकारीच अमली पदार्थांचे रॅकेट चालविण्याचे प्रकार पहिल्यांदाच पुढे आले आहे. पंजाब मध्ये पाकिस्तान मधून मोठ्या प्रमाणावर ड्रग सप्लाय होतो. त्याची मोठी साखळी तेथे कार्यरत आहे. या संदर्भात सध्या पोलिसांनी अतिशय गांभीर्याने कारवाई सुरू केली आहे. त्यातूनच देवळालीचे हे रॅकेट उघडकीस आले.

स्कूल ऑफ आर्टीलरी ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील लष्करी संस्था आहे. या संस्थेचे संशोधन आणि तोफखाना यामध्ये मोठे काम आहे. अनेक महत्त्वाच्या संस्था आणि उपक्रम येथे सुरू असतात. लष्करालातीलच अधिकारी ही माहिती शत्रुराष्ट्र पाकिस्तानला देत असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत आता स्थानिक पोलिसांतही नोंद करण्यात आली आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT