Girish Mahajan, BJP
Girish Mahajan, BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

प्रश्न `एनसीबी` भाजप कनेक्शनचा; गिरीश महाजन बोलले `एनसीपी` वर!

Sampat Devgire

नाशिक : `एनसीबी`ने (NCB) आपल्या कारवाईत भाजपशी (BJP) संबंधीत संशयितांना का सोडले? असा आरोप होतो आहे, असा प्रश्न भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर अतिशय सफाईदारपणे त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाविषयी बोलणे सुरु केले. हे कोणाच्या लक्षातही आले नाही. त्यामुळे ड्रग्ज प्रकरण भाजपला अडचणीत आणते आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला.

श्री. महाजन यांच्या उपस्थितीत भाजपचा ओबीसी जागर मोहीम मेळावा झाला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना ड्रग्ज प्रकरणाविषयी प्रश्न विचारण्यात आला. या प्रकरणात भाजपशी संबंधीत आरोपींना सोडले अशी टिका राष्ट्रवादीने केली आहे. त्याबाबत माहिती देण्याएैवजी श्री. महाजन यांनी अतिशय सफाईदारपणे टाळले. त्यांनी थेट खरे म्हणजे युवा पिढी अंमली पादर्थांच्या आहारी गेली आहे. त्यांना त्यातून वाचविण्याची गरज आहे. मात्र एनसीपी ड्रग्जबाबत वेगळीच भूमिका घेत आहे. त्यांचा उद्देश नेमका काय आहे, हे कळत नाही, असे सांगत टिकेचा सूर लावला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पावर यांच्या संस्थांवर आयकर विभागाने धाडी घातल्या. त्याबाबत टिका होते आहे. शरद पवार उत्तर प्रदेशातील शेतकरी प्रकरणावर बोलले, त्यानंतरच या धाडी कशा झाल्या?. असे विचारण्यात आले.

त्यावर ते म्हणाले, ज्या दिवशी शरद पवार बोलले त्याच्या दुसऱ्याच दिवशी धाडी झालेल्या आहेत. एव्हढ्या मोठ्या धाडी काही योजून होत नाहीत. शरद पवार बोलले आणि दहा तासांत लगेच धाडी टाका, असे काही होत नाही. हे सगळे पूर्वीपासून सुरु असते. अभ्यास केलेला असतो. माहिती संकलीत केली जाते. तात्रीक बाबी तपासाव्या लागतात. त्यानंतरच एव्हढ्या मोठ्या संस्था असतात, त्यावर धाडी टाकल्या जातात. त्यामुळे मला न पटणारे आहे.

याचा काही फायदा होईल का? यावर ते म्हणाले, यात फायद्या तोट्याचा संबंध नाही. धा़डसत्र म्हणजे अवैध संपत्ती, त्यांनी काय कर लपवलेला आहे, काय चुकविलेला आहे हे बघण्याचा काम असते. यासंदर्भात अजित पवार यांनी देखील म्हटले आहे की, एकदा पाहुणे जाऊ द्या, मग बोलू. त्यामुळे एकदा पाहूणे जाऊ द्या. मग ते देखील बोलतील. मग त्याचा विचार करता येईल. त्यातून काय निष्पन्न होईल. जे काही खरे, खोटे असेल ते सर्वांच्या समोर येईल.

महाविकास आघाडीच्या सोमवारच्या महाराष्ट्र बंद विषयी ते म्हणाले, लोक बंद करण्याच्या मनस्थितीत नाहीत. व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, लहान-मोठ्या गाडीवाले असतील असे सगळेच राजकीय घटक कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात एव्हढे त्रस्त झालेले आहेत. ते बंद करू इच्छीत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र बंदचीजी राजकीय हाक आहे, ती यशस्वी होईल असे मला वाटत नाही. लोक त्याला साथ देणार नाहीत.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT