Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe : संगमनेरच्या हिंसाचारावर मंत्री विखेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले 'षडयंत्र अन्..'

BJP leader Minister Radhakrishna Vikhe : संगमनेरमधील धांदरफळ इथं सुजय विखे यांच्या सभेनंतर झालेल्या हिंसाचारावर मंत्री राधाकृष्ण विखेंची यांनी प्रतिक्रिया देत मोठा आरोप केला आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar News : संगमनेरमधील हिंसाचारावर माजी खासदार सुजय विखे यांनी आपल्यावर पूर्वनियोजित हल्ल्याचा कट असल्याचा आरोप केल्यानंतर त्यांचे वडील भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देत मोठा आरोप केला. 'हा सर्व राजकीय षडयंत्राचा भाग असून, हल्ला करणे हाच हल्लेखोरांचा प्रयत्न होता', असा आरोप मंत्री विखे यांनी केला आहे.

भाजपचे (BJP) माजी खासदार सुजय विखे संगमनेर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. यासाठी भाजपकडे त्यांनी उमेदवारी मागितली असून, त्यांनी संगमनेर मतदारसंघात दौरे वाढवले आहे. यातून काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात आणि सुजय विखे यांच्या राजकीय संघर्ष पेटला आहे. दोघं एकमेकांवर टीका करत आहेत.

संगमनेरमधील धांदरफळ इथल्या सुजय विखेंच्या सभेत त्यांचे समर्थक वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. यानंतर संगमनेरमध्ये थोरात आणि काँग्रेसच्या समर्थकांनी विखेंची सभा उधळून लावली. याचे पडसाद संगमनेर शहरात उमटले आणि हिंसाचार भडकला. वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या सर्व घटनेवर माजी खासदार सुजय विखे यांनी विधानाचा निषेध करताना, आपल्यावर पूर्वनियोजित हल्ल्याचा कट होता, असा गंभीर आरोप केला.

सुजय विखे(Sujay Vikhe) यांच्या सभेतील त्या वादग्रस्त विधानाचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत. विरोधकांनी देखील या मुद्य्यावरून महायुतीवर टीका करणे सुरू केले आहे. तर सुजय विखे यांच्यासाठी त्यांच्या मातोश्री शालिनी विखे मैदानात उतरल्या आहेत. याशिवाय त्यांचे वडील मंत्री राधाकृष्ण विखे यांनी देखील या सर्व घटनांवर समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत गंभीर आरोप केला आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे यांनी धांदरफळ इथल्या सभेत वसंतराव देशमुख यांनी केलेले वक्तव्य म्हणजे, राजकीय षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध देखील केला. संगमनेरमध्ये सुजय विखे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांच्यावर हल्ला करण्याचा हल्लेखोरांचा प्रयत्न होता, असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.

याशिवाय संगमनेरमध्ये सभेनंतर उफाळलेल्या हिंसाचारावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिलांवर झालेल्या हल्ल्याचा देखील निषेध करतो, असे मंत्री राधाकृष्ण विखे(Radhakrishna Vikhe) यांनी त्यांच्या समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT