Radhakrishna Vikhe 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe : फडणवीसांचं कौतुक, तर पवारांना टोला; मंत्री विखेंनी गणरायाकडं नेमकं काय मागितलं?

Pradeep Pendhare

Ahmednagar News : "अनेक वर्ष सत्ता भोगलेल्यांनी राज्यासाठी काहीच करू शकले नाहीत. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कौशल्याबरोबर राज्यासाठी समृद्ध, असं कार्य केलं जात आहे. त्यामुळं त्यांना टार्गेट केलं जातं. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक विकास कामं केली आहेत", असं कौतुक करताच शरद पवार यांच्यावर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी निशाणा साधला.

आता नातवाकडं पाहूनच पुढं जावं लागतं. आपल्याला शिकावं लागतं, असा टोला शरद पवार यांचं नाव न घेता त्यांनी लगावला.

भाजप (BJP) नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते लोणी इथल्या साखर कारखाना कार्यस्थळावर गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधलाना, त्यांनी राज्यात विकास काम करणारे भाजप नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जात आहे. 'विरोधकांची ही रणनीती आहे. विकास काम करणाऱ्यांनाच टार्गेट करणं हेच विरोधकांचं काम आहे', अशी टीका मंत्री विखे यांनी विरोधकांवर केली.

'अनेक वर्ष सत्ता भोगलेल्यांना आपण राज्यासाठी काहीही करू शकलो नाही, याचे देखील शल्य विरोधकांना आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मात्र विकास कामं कार्यातून राज्याला दाखवली. फडणवीस यांचे व्यक्तिमत्त्व कार्यकुशल आणि समृद्ध, असं आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्यात अनेक विकास कामे मार्गी लावली, असा दावा मंत्री विखे यांनी केला.

'राज्यासाठी काहीच करू शकलो नाही म्हणून, ज्यांना शल्य आहे, तेच देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत', अशी विरोधकांवर टीका करताना शरद पवार यांच्यावर देखील मंत्री राधाकृष्ण विखे यांनी निशाणा साधला. 'आता नातवाकडे पाहून पुढे जावे लागतं, आपल्याला शिकावं लागतं, अशी स्थिती आहे', असा टोला मंत्री विखे यांनी शरद पवार यांचं नाव न घेता लगावला.

गणरायाकडं 'शक्ती' मागितली

'राज्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील धरणं भरली आहे. शेतकरी राजा सुखावला आहे. मात्र काही भागात अतिवृष्टीमुळे संकट उभं राहीलं आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांमध्ये राज्यातील महायुती सरकार ठामपणे उभं आहे', असे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितलं. 'सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे. विकासासाठी गणरायाने आम्हाला शक्ती द्यावी', अशी प्रार्थना आपण केली असल्याची मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT