Rahata Municipal Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

EVM machine change controversy : ईव्हीएम बदलले, बिघाडलेल्या मशीन न दाखवल्याने वादाला तोंड फुटले; राहाता इथल्या मशिनवर कमळ चिन्हं ठळक दिसायचे!

Rahata Municipal Election EVM Machine Change Sparks Major Controversy : राहाता इथल्या ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याचे कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या ऐनवेळी बदलल्याने वादाला तोंड फुटलं आहे.

Pradeep Pendhare

Rahata municipal election controversy : राहाता नगरपालिका निवडणुकीत ऐनवेळी ईव्हीएम मशिन बदलल्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या मशिन बदलताना, निवडणूक अधिकाऱ्यांनी बिघाडाचे कारण दिले. परंतु बिघाड झालेल्या मशिन उमेदवारांना न दाखवल्याने राजकीय वादाला उफाळला आहे.

निवडणूक अधिकाऱ्यांनी पाच ईव्हीएम मशिन बदलल्या आहेत. दरम्यान, राहाता इथल्या ईव्हीएम मशिनवर इतर चिन्हांच्या तुलनेत कमळ चिन्ह ठळक दिसायचे असा आक्षेप राहाता शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार धनंजय गाडेकर यांनी घेतला होता.

भाजप (BJP) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघातील राहाता नगरपालिका निवडणुकीत काल चुरशीचं मतदान झालं. तब्बल 77.87 टक्के मतदान झालं. परंतु मतदानाच्या अदल्या रात्री ईव्हीएम मशिनची तपासणी करण्यात आली. यात पाच ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड असल्याचे समोर आलं. या मशिन निवडणूक अधिकाऱ्यांनी बदलल्याने वादाला तोंड फुटले आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून मतदानासाठी निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यापूर्वी ईव्हीएम मशिनची (EVM Machine) पुन्हा चाचणी घेण्यात आली. त्यात पाच मशिनमध्ये बिघाड आढळला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याऐवजी दुसऱ्या मशिन कर्मचाऱ्यांना दिल्या. त्याबाबत उमेदवारांना कळवून कागदावर त्यांच्या सह्या घेण्याची प्रक्रिया सुरू होताच उमेदवार आक्रमक झाले.

बिघाडलेल्या मशिन कुठे आहेत

उमेदवार समर्थकांसह निवडणूक कार्यालयात आल्यावर, आम्हाला बिघडलेल्या मशिन तरी दाखवा, अशी मागणी केली. मात्र, त्यांच्या या मागणीची पूर्तता करण्यात निवडणूक अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली. यावरून बराचकाळ वाद विवाद सुरू राहिला. त्यानंतर लेखी तक्रारी देण्याचा पर्याय पुढे आला.

बिघाड दिसल्याने मशिन बदलल्या

निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा राशीनकर यांनी, यापूर्वी ज्या मशिन उमेदवारांच्या समक्ष आणि त्यांची सही घेऊन सील केल्या होत्या. त्या कोट्यातील मशिन बिघडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बिघडलेल्या मशिनच्या बदलून देण्यात आल्या आहे, असे सांगितले.

निवडणूक आयोगाकडे लेखी आक्षेप

राहाता शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार धनंजय गाडेकर म्हणाले, पाच मशिन बिघडल्या मान्य असे समजू. मात्र, बिघडलेली मशिन आम्हाला दाखवा. ही सर्वच उमेदवारांची मागणी होती. ही मागणी का पूर्ण केली नाही. बिघडलेली मशिन दाखवायला काय हरकत होती. या प्रकाराबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी आक्षेप नोंदविला आहे.

कमळ चिन्ह ठळक दिसायचे

तसंच ईव्हीएम मशिनवर अन्य सर्व उमेदवारांच्या चिन्हांच्या तुलनेत कमळाचे चिन्ह ठळक दिसायचे. त्यावर पाच दिवसांपूर्वी आक्षेप घेतला. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या समक्ष ते चिन्ह पट्टी लावून मोजण्यात आले. माझा आक्षेप ग्राह्य धरून अन्य सर्व चिन्हांप्रमाणे कमळ चिन्हाचा आकार ठेवण्यात आल्याचा दावा धनंजय गाडेकर यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT