MLA Rahul Dhikale Wife Aditi Dhikale Death Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : भाजप आमदार राहुल ढिकलेंच्या पत्नीचे निधन, नाशिक दौऱ्यावर आलेल्या CM फडणवीसांनी घेतले पार्थिवाचे अंत्यदर्शन

MLA Rahul Dhikale wife death : राहुल ढिकले हे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार आहेत. शनिवारी त्यांच्या पत्नी आदिती यांचे निधन झाले. नाशिक दौऱ्यावर असलेल्या CM फडणवीसांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

Ganesh Sonawane

Nashik News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राहुल ढिकले यांच्या पत्नीचे निधन झाले. ही माहिती मिळताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकमधील पुढील कार्यक्रम रद्द केले आहेत.

भाजपचे नाशिक पूर्व मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल ढिकले यांच्या पत्नी आदिती ढिकले (वय ४०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज शनिवार (दि. २५) सकाळी निधन झाले. आदिती ढिकले यांच्यावर सायंकाळी ५.३० वाजता गणेशवाडी येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अदिती ढिकले यांची शुक्रवारी सायंकाळी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तत्काळ एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे आमदार राहुल ढिकले यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका शासकीय कार्यक्रमानिमित्त त्र्यंबकेश्वरच्या दौऱ्यावर आले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शुभारंभ झाला. त्यानंतर फडणवीसांना या दु:खद घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपले नाशिकमधील पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले. कुंभमेळा बैठक, पुरोहित संघाची बैठक मुख्यमंत्र्यांकडून रद्द करण्यात आली आहे.

यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ढिकले यांच्या निवासस्थानी धाव घेत आदिती ढिकले यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. ढिकले कुटूबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज अहिरे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, तहसलीदार पंकज पवार, अपर तहसीलदार अमोल निकम आदींसह नेते मंडळी व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे व पश्चिम विधानसभेच्या आमदार सीमा हिरे, भाजप शहराध्यक्ष सुनिल केदार यांनी देखील शोक व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT