Rahul Gandhi Martial Arts Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rahul Gandhi : राहुल गांधींचा राजकारणापलीकडचा अंदाज; जिल्हाध्यक्षांसोबत मॅटवर उतरले, शिकवले मार्शल आर्ट

Rahul Gandhi Nashik : काँग्रेसच्या नाशिक येथे झालेल्या शिबिरात राहुल गांधी यांनी जिल्हाध्यक्षांना चक्क तासभर मार्शल आर्टचे धडे दिले. त्यांनी स्वत: आयकिडो या जपानी युद्धकलेत ब्लॅक बेल्ट मिळवला आहे.

Ganesh Sonawane

Rahul Gandhi Martial Arts : काँग्रेसच्या नाशिक येथे झालेल्या संघटन सृजन या प्रशिक्षण शिबिरात लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांचा राजकारणापलीकडचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. पक्षसंघटन व धोरणांवर चर्चा करताना राहुल गांधींनी शिबिरार्थी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना चक्क तासभर मार्शल आर्टचे धडे दिले.

राज्यातील कॉंग्रेसच्या 78 नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे १० दिवसीय निवासी शिबिर नाशिकमध्ये पार पडले. २ सप्टेंबर रोजी या शिबिराचा समारोप झाला. त्यात जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वत: राहुल गांधी नाशिकमध्ये आले होते.

राहुल गांधी जिल्हाध्यक्षासोबत मॅटवर बसले. त्यासाठी आवश्यक असलेला ड्रेस परिधान करत मार्शल आर्टचे धडे दिले. मार्शल आर्ट्स अर्थात आयकिडो आणि जिऊ-जित्सू म्हणजे अहिंसा, स्वसंरक्षण आणि शरीर नियंत्रणाची एक कला आहे. जिल्हाध्यक्षांसोबत राहुल गांधींनी जपानी मार्शल आर्ट्स (जिऊ-जित्सू) खेळण्याचा आनंद घेतला व प्रशिक्षण देखील दिलं.

जिउ-जित्सू (Jiu-Jitsu) ही एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी जपानी युद्धकला (Martial Art) आणि सेल्फ-डिफेन्स (स्वतःचे रक्षण करण्याची) पद्धत आहे. यात शत्रूला न मारता किंवा त्याच्यावर प्रहार (Strikings / Pushes) न करता, त्याला जमिनीवर पाडून त्यावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यावर भर दिला जातो. राहुल गांधी यांनी आयकिडो या जपानी युद्धकलेत ब्लॅक बेल्ट मिळवला आहे.

या क्रीडा प्रकारातून स्वतःच्या शरीरावर व रागावर कसे नियंत्रण ठेवावे आणि अहिंसेच्या मार्गाने कसे काम करत राहावे यावर राहुल गांधींनी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन केले. राहुल गांधी यांनी जिल्हाध्यक्षांना मार्शल आर्टमधील विविध पोझिशन्स, आत्मसंरक्षणाच्या युक्त्या आणि शारीरिक संतुलनाचे बारकावे प्रत्यक्ष करून दाखवले.

राजकारणात आपल्या विरोधकांनी कितीही टीका केली. चुकीचे वर्तन केले तरी हिंसेचा वापर न करता अहिंसा व खिलाडूवृत्तीने उत्तर द्यावे, असेही त्यांनी सूचित केले. अहिंसेचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी महात्मा गांधी यांची उदाहरणे आणि छायाचित्रे दाखवल्याची माहिती जिल्हाध्यक्षांकडून देण्यात आली.

राजकारणात पक्षाच्या कामात व्यस्त असताना मानसिक शारीरिकदृष्ट्या फिट राहणे किती गरजेचे आहे, हे सांगत त्यांनी पदाधिकाऱ्यांना दैनंदिन आयुष्यात खेळाचा किंवा व्यायामाचा समावेश करण्याचा सल्ला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT