Rahul Gandhi Congress meeting Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या संवादाने भारावले कुटुंबीय, "समाजातील द्वेष संपवा, काँग्रेस जणांत एकोपा वाढवा"

Rahul Gandhi Congress workers families: राहुल गांधी यांनी साधला काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांशी संवाद.

Sampat Devgire

Rahul Gandhi Nashik Visit: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज गेल्या दहा दिवसांपासून नाशिकला सुरू असलेल्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षंच्या उपस्थितीतील शिबिराचा समारोप झाला. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधला. या संवादाने पदाधिकाऱ्यांचे कुटुंबीय भारावले.

गेल्या दहा दिवसांपासून येथे राज्यातील काँग्रेस पक्षाच्या 78 जिल्हा अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे शिबीर सुरू आहे. शिबिराचा समारोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी राहुल गांधी यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांची मनोभूमिका समजून घेतली. 

विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. त्यामुळे राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित झाले होते. राहुल गांधी यांनी या कुटुंबीयांतील तरुण आणि तरुणींची आस्थेने विचारपूस केली. 

यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना काय संदेश द्याल, अशी विचारणा कुटुंबीयांनी केली. त्यावर काँग्रेस हे कुटुंब आहे. एकमेकांच्या सुखदुःखात आस्थेने सहभागी होत चला, असे गांधी म्हणाले.

काँग्रेस पक्षाला समाजातील द्वेष आणि घृणा संपुष्टात आणायची आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी झटले पाहिजे. त्याची सत्ताधारी आणि राजकीय मंडळी समाजात द्वेष पसरविण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहे.  

काँग्रेस पक्षाने प्रदीर्घकाळ देश आणि समाज उभारणीसाठी योगदान दिले आहे. प्रेम आणि आपुलकी हाच काँग्रेसचा संदेश आहे. समाजातील आणि धर्मातील वाद संपुष्टात आले पाहिजे. देशाच्या विकासातूनच युवक आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला पुढे जाण्याची आणि विकासाची संधी मिळणार आहे.

आगामी काळात काँग्रेस पक्ष समाजाच्या प्रत्येक घटकाला आपलेसे करण्यासाठी परिश्रम घेणार आहे. यासंदर्भात निवडणूक एवढेच लक्ष्य न ठेवता सातत्याने देशाच्या हिताचे काम करीत राहिले पाहिजे, असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांसह राज्यातील विविध वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT