Akshay Kardile Record Victory Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Akshay Kardile Record Victory : अक्षय कर्डिलेंचा मतांबरोबर मताधिक्याचा विक्रम; वडिलांनाच टाकलं मागं, 2029च्या आमदारकीला असणार चॅलेंज?

BJP Akshay Kardile wins Rahuri bypoll 2026 with record-breaking votes, surpassing the tally secured by his late father Shivaji Kardile in the 2024 assembly election : राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांनी त्यांचे दिवंगत वडील आमदार शिवाजी कर्डिलेंपेक्षा सर्वाधिक मते घेतानाच, सर्वाधिक मताधिक्य मिळवलं.

Pradeep Pendhare

Rahuri bypoll 2026 result : अक्षय कर्डिले यांनी राहुरी पोटनिवडणूक भावनात्मक पातळीवर लढली. त्यांचे वडील दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर, ते निवडणुकीला समोरे गेले. शिवाजी कर्डिले हे राजकारणात प्रदीर्घ काळ कार्यरत असताना, त्यांनी राजकारण कधी कुटुंबापर्यंत नेलं नाही.

पण राजकारणातील समाजकारणानं त्यांना स्वस्थ बसू दिलं नाही. आजारपणात देखील त्यांनी विधानसभा 2024च्या निवडणुकीला समोरे जात, विजयश्री खेचून आणला. पण आता राहुरी पोटनिवडणुकीत त्यांच्या पश्चात अक्षय कर्डिले यांनी मोठं मताधिक्याबरोबर वडिलांनी 2024च्या निवडणुकीत मिळवलेल्या मतांपेक्षा अधिकची मते घेत, राज्याचे लक्ष वेधून घेतलं.

शिवाजी कर्डिले यांचा राजकीय प्रवास सोपा नव्हता. दुधवाला ते मंत्रीपदापर्यंत त्यांनी मजल मारली होती. गावचं सरपंच, पुढे अपक्ष राहून आमदारकी लढवली. त्यानंतर शिवसेना अन् तेथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस, आणि भाजपमध्ये (BJP) चांगलेच स्थिरावले होते. या राजकीय वाटचालीत कोणताही राजकीय वारसा त्यांच्या मागे नव्हता.

राजकारणातून समाजकारण हेच हेरून त्यांनी सुरू केलेला राजकीय प्रवासाने एक स्वतःचं कार्यकर्त्यांचं अहिल्यानगर जिल्ह्यासह आणि जिल्ह्याबाहेर मोठं राजकीय जाळं निर्माण केलं. यातून त्यांनी प्रस्थापित राजकीय नेत्यांना देखील आव्हान दिलं. त्यातून निर्माण झालेले राजकीय पेचप्रसंग हे शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी याच कार्यकर्त्यांच्या जोरावर परतवून लावले.

राजकारण करताना, प्रशासकीय पातळीवर पकड असावी लागते. ते ओळखून शिवाजी कर्डिले यांची प्रशासकीय पातळीवर असलेली मजबूत पकडीचे आजही दाखले दिले जातात. पुढे त्यांनी सहकार एन्ट्री घेतली. जिल्हा सहकारी बँकेवर प्रस्थापितांबरोबर काम करताना, त्यांनी अध्यक्षपद मिळवले. भाजप पहिला आमदार जिल्हा सहकारी बँकेचा अध्यक्षपदावर विराजमान होण्याचा मान मिळवला.

विधानसभा 2024च्या निवडणुकीला समोरे जाताना, शिवाजी कर्डिले यांनी त्यांचे पांरपारिक राजकीय प्रतिस्पर्धी माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचा पराभव केला. या निवडणुकीत त्यांना 1 लाख 35 हजार 859 एवढी मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवारी प्राजक्त तनपुरे यांना 1 लाख 1 हजार 372 एवढी मते मिळाली.

विधानसभा 2024 मधील या दोघांचे आकडे पाहाता, आता अक्षय कर्डिलेंना पोटनिवडणुकीत मिळालेली मते पाहाता, अक्षय कर्डिले हे दोघांच्या पुढे निघून गेलेले दिसतात. अक्षय कर्डिले यांना या पोटनिवडणुकीत 1 लाख 40 हजार 93 मते मिळाली आहेत. त्यांचे दिवंगत वडील शिवाजी कर्डिले यांना 2024च्या निवडणुकीपेक्षा सुमारे 4 हजार 234 मते ही अधिकची आहे. तर प्राजक्त तनपुरेंपेक्षा 38 हजार 721 मते अधिकची आहेत.

अक्षय कर्डिले यांनी या निवडणुकीत मिळवलेले मताधिक्य विक्रमी आहे. सुमारे 1 लाख 12 हजार 587 मतांचं मताधिक्य त्यांनी मिळवलं आहे. ही निवडणूक प्रतीकात्मक जरी असली, तरी अक्षय कर्डिलेंनी मिळवलेले मतं आणि मताधिक्य हे विधानसभा 2029ला विरोधकांसाठी चॅलेंज देणारं असणार आहे, अशी चर्चा आता रंगली आहे. त्यांचे हे चॅलेंज त्यांच्या पांरपारिक राजकीय प्रतिस्पर्धांना देखील असू शकतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT