Prajakt Tanpure Shivaji Kardile Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prajakt Tanpure Allegations : भाजप आमदाराचं निवासस्थान अतिक्रमणात, कारवाई कधी? माजी मंत्री तनपुरेंनी प्रशासनाला 'घरगडी' म्हणत सुनावले

Former MLA Prajakt Tanpure BJP MLA Shivaji Kardile encroachment Rahuri Assembly constituency : राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचे निवासस्थान अतिक्रमणात असल्याचा आरोप माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra Politics News : अहिल्यानगर जिल्ह्यात अतिक्रमणाविरोधात जिल्हा प्रशासनाची जोरदार कारवाई सुरू आहे. यात राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील अतिक्रमणाविरोधातील कारवाई वादात सापडली आहे. यावरून विरोधकांनी भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना टार्गेट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुर यांनी आमदार कर्डिले यांचे निवासस्थानाच्या अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करत, जिल्हा प्रशासन कारवाई करणार का? असा सवाल केला आहे.

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी जिल्ह्यातील अतिक्रमण मोहिमेचे स्वागत केले. कायद्यानुसार कारवाई होत असेल, तर या मोहिमेचे स्वागत आहे. परंतु काही ठराविक लोकांना अतिक्रमणाच्या नावाखाली टार्गेट केले जात आहे. गोरगरिबाचे अतिक्रमण काढण्याअगोदर जिल्हा प्रशासनाने धनदांडग्यांचे, आमदार, खासदारांच्या अतिक्रमणांवर हतोडा फिरवावा, अशी मागणी केली. धनदांडग्यांचे अतिक्रमण काढल्यानंतर गोरगरिबांच्या अतिक्रमणांवर कारवाई केली असती, तर त्याचे पथदर्शी उदाहरण झाले असते, असेही तनपुरे यांनी म्हटले.

भाजप (BJP) आमदार शिवाजी कर्डिले यांचे निवासस्थानाचे अतिक्रमणार भाष्य करताना, माजी मंत्री तनपुरे यांनी कर्डिले यांचाच 16 जून 2022 मध्ये महसूल विभागाला अतिक्रमणाबाबत दिलेला जबाब वाचून दाखवला. याचवेळी पुढाऱ्यांचे घरगडी म्हणून काम करणारा जिल्हा प्रशासन कारवाईची धमक दाखवणार का? असा सवाल केला.

प्राजक्त तनपुरे म्हणाले, "माझ्याकडे एक जबाब आहे, तो 16 जून 2022 मधील असून तो शिवाजी भानुदास कर्डिले यांचा आहे. शिवाजी कर्डिले यांनी हा जबाब महसूल विभागाला लिहून दिलेला आहे. त्यांच्या निवासस्थानाविषयी हा जबाब आहे. त्यांच्या निवासस्थानच्या अतिक्रमणाविषयी तक्रार होती. त्याचा हा जबाब आहे".

कर्डिलेंचा जबाब सांगतोय

'सहायक संचालक नगररचना यांनी मंजूर केलेल्या रेखांकनानुसार शेत निवासस्थानाच्या तळमजल्याचे बांधकाम केलेले आहे. तथापि तळमजल्यावरचा पहिल्या मजल्याचे सुधारित नकाशे तयार करून, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे बांधकामासाठी मंजुरीचा प्रस्ताव करणार आहे. म्हणजेच, हे निवासस्थान दहा ते पंधरा वर्षांपूर्वी बांधलेले आहे. म्हणजेच, तळमजल्याचे बांधकाम नियमित आहे. परंतु त्यावरील पहिल्या मजल्याचे बांधकाम अनधिकृत आहे, असा निष्कर्ष येथे निघतो. त्याच्यात बांधकाम परवानगीसाठी प्रकरण सादर केलेले नाही. ते करणार आहेत, असे जबाबात म्हटले आहे', याकडे तनपुरे यांनी लक्ष वेधले.

प्रशासनाच्या दुटप्पीपणावर ठेवलं बोट

'प्राजक्त तनपुरे यांनी पुढे अतिक्रमणाबाबत गंभीर आरोप करताना, माझ्या माहितीप्रमाणे बुऱ्हाणनगर आणि नागरदेवळे यांच्या शिवरस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम केलेले आहे, असा आरोप केला. याची देखील प्रशासनाने चौकशी करावी. आमदाराचे निवासस्थानच अतिक्रमणात आहे, तर मग प्रशासन कारवाई का करत नाही? जिल्ह्यातील सर्व आमदार-खासदारांचे सर्व अतिक्रमण पाडावेत, त्यानंतर सर्वसामान्यांचे अतिक्रमणावर कारवाई करावी', अशी मागणी केली.

आमदार-खासदारांचे अतिक्रमण तपासा

'लबाड पुढाऱ्यांवर कारवाई करावी. पण जिल्हा प्रशासन या पुढाऱ्यांच्या हातातील घरगडी झाल्यासारखे आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व आमदार-खासदारांचे अतिक्रमण तपासा आणि त्यावर कारवाई करा. कायद्यानुसार यांची अनधिकृत बांधकाम पाडण्याची धमक दाखवावी', असेही माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT