Rahuri Bypoll Twist 1 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rahuri Bypoll Twist : ‘अर्ज न भरणे, हेच उत्तर!’ मंत्री विखेंच्या 'गुगली'ने तनपुरे समर्थक चक्रावले?

Minister Radhakrishna Vikhe comments on Prajakt Tanpure possible support to BJP candidate Akshay Kardile in Rahuri by-election : भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पाठिंब्याबाबत मोठ विधान केले आहे.

Pradeep Pendhare

Rahuri bypoll 2026 : माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी न करण्याचा निर्णय पदरात पाडून घेण्यात भाजप जरी यशस्वी झाली असली, तरी त्यांचा पाठिंबा मिळवण्यात अजून यश आलेले नाही. तनपुरे यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपची धडपड शेवटपर्यंत सुरू आहे.

तसं उद्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. तत्पूर्वी भाजपचे अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तनपुरेंचा पाठिंब्याबाबत मोठं विधान केलं आहे. मंत्री विखे पाटील यांच्या या 'गुगली'ने तनपुरे समर्थक चक्रावले आहेत.

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) उमेदवारी न करण्याबाबत भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी ठरली. यानंतर फडणवीस अन् तनपुरे यांच्या टायमिंगचा खेळ सुरू झाला. हे टायमिंगमुळे शेवटपर्यंत उत्सुकता वाढवली. पण तो जुळला की नाही, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी केली नसली, तरी त्यांचा जाहीर पाठिंबा मिळवण्यात भाजपची (BJP) अजूनही धडपड सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी प्रचार सांगता सभा झाली. त्याचवेळी तनपुरे यांनी कार्यकर्त्यांबरोबर निर्णय बैठका घेतल्या. मतदारसंघातील शेकडो गावातील कार्यकर्त्यांबरोबर तनपुरे यांच्या दिवसभर बैठका सुरू होत्या.

तनपुरे यांच्या कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या बैठकांमध्ये नेमकं काय झाले, कोणते निरोप दिले, याचा तपशील गोपनीय ठेवण्यात आला आहे. दादा जे काही निर्णय घेतील, त्याबरोबर आम्ही असू, असे कार्यकर्त्यांकडून सांगण्या आले आहे. तनपुरे यांनीही कार्यकर्त्यांबरोबर बैठकीत काय झाले, याचा तपशील जाहीर केलेला नाही. त्यामुळे तनपुरे कार्यकर्त्यांची निवडणूक भूमिका कशी असेल, हे देखील उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

तनपुरेंच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेची उत्सुकता

भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना यावर प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री विखे पाटील यांच्या प्रतिक्रियेमुळे तनपुरे समर्थकांमध्ये गोंधळ उडाला आहे. पण तनपुरे यांचे कार्यकर्ते झालेल्या बैठकीनुसार, निर्णयानुसार मतदानाच्या दिवशी आणि आगामी काळात काम करताना दिसणार आहे. तनपुरेंच्या कार्यकर्त्यांची नेमकी भूमिका काय असेल, हे उद्या मतदानाच्या दिवशी स्पष्ट होईल.

मंत्री विखे पाटलांची 'गुगली'

तनपुरे यांच्या पाठिंब्यावर मंत्री विखे पाटील यांनी म्हटले, "त्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता नाही. त्यांनी अर्ज दाखल केला नाही म्हणजेच, पाठिंबा दिलेला आहे. राहुरीत वेगळ्या प्रसंगातून पोटनिवडणूक होत आहे. तनपुरे यांचे कार्यकर्ते भाजपच्या प्रचारात सक्रिय झालेले आहेत. त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली नाही. प्राजक्त तनपुरे यांचे चुलते मुख्यमंत्र्यांच्या सभेवेळी व्यासपीठावर उपस्थित होते."

तनपुरे अन् कार्यकर्ते स्थिर भूमिकेत

मंत्री विखे पाटलांच्या या प्रतिक्रियेवर तनपुरे यांच्याकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मंत्री विखे पाटलांच्या या गुगलीपुढे तनपुरे कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला आहे हे नक्की! परंतु काही कार्यकर्ते तनपुरेंबरोबर झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार भूमिकेत आहेत, स्थिर आहेत. पण तनपुरेंची भूमिका उद्या मतदानाच्या दिवशी अधिक स्पष्ट होईल, असे देखील सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT