Prajakt Tanpure ED case verdict impact on Rahuri by-election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prajakt Tanpure ED case : प्राजक्त तनपुरेंची 'ED' पिडा संपली; निकालाच्या टायमिंगमुळे राहुरी पोटनिवडणुकीत सनसनाटी

ED case against Prajakt Tanpure : माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या ईडी चौकशीचा, न्यायालयीन निकाल राहुरी पोटनिवडणूक सुरू असतानाच आला आहे.

Pradeep Pendhare

ED probe Maharashtra politician : माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज न भरणं, सत्ताधारी भाजपच्या शिष्टाईला होकार देणं आणि यातच सुरू असलेल्या 'ईडी' चौकशीचा न्यायालयीन निकाल बाजूने येणं, यावरून राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत उद्याच्या मतदानाच्या तोंडावर सणसणाटी पसरली आहे. या निकालामुळे, राहुरी पोटनिवडणुकीच्या एक दिव मतदानापूर्वी तनपुरे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

राहुरी विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी नागपूर इथं खरेदी केलेल्या साखर कारखान्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरू होती. या चौकशीविरोधात तनपुरे यांनी, उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीची चौकशी अंतिम टप्प्यात आली असतानाच, न्यायालयाकडून तनपुरे यांच्या बाजूने लागला आहे.

न्यायालयाच्या (Court) या निकालामुळे माजी मंत्री तनपुरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु या निकाल नेमका, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीला उद्या (ता. 23) होत असलेल्या मतदानावेळी लागला आहे. तनपुरे उमेदवारी करत नसले, तरी भाजपला मताधिक्य मिळवण्यासाठी त्यांचा पाठिंबा लागत आहे.

प्राजक्त तनपुरे या पाठिंब्यावर अजून कोणतेही भाष्य केलेलं नाही. पण ईडी चौकशीमुळे तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं बोललं जात आहे. यातच न्यायालयाचा हा निकाल आल्याने, या चर्चांना अधिक हवा मिळाली आहे. या निकालावर तनपुरे काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे 25 हजार कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे. याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. नंतर हा गुन्हा 'ईडी'ने तपासासाठी घेतला. हा सर्व प्रकार सहकारी साखर कारखाना घोटाळा म्हणून ओळखला जात आहे.

तनपुरेंवरील आरोप काय?

प्राजक्त तनपुरे हे राज्यमंत्री होते. राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना तोट्यात निघाल्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्त केला. यानंतर 2012 मध्ये या कारखान्याचा लिलाव जाहीर झाला. हा लिलाव जाहीर झाला, तेव्हा प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे हे बँकेच्या संचालक मंडळावर होते.

संशयास्पद व्यवहार

कारखान्याचा लिलाव जाहीर केला, तेव्हा कारखान्याची विक्री किंमत 26 कोटी जाहीर करण्यात आली होती. मात्र, तनपुरे यांच्या प्रसाद शुगर अँड अलाइड, या कंपनीने तो केवळ 13 कोटी रुपयांना विकत घेतला. हाच व्यवहार 'ईडी'ला संशयास्पद वाटत होता अन् त्याचीच चौकशी सुरू होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT