Prakash Ambedkar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rahuri Bypoll : प्रकाश आंबेडकरांची 'राहुरी'साठी 'जर', 'तर' भाषा; 'मविआ'च्या एकोप्यावर शंका!

Prakash Ambedkar says Vanchit Bahujan Aghadi would not have fielded a candidate if Prajakt Tanpure was nominated by Sharad Pawar-led NCP in Rahuri by-election : वंचित बहुजन आघाडीने राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराचा प्रचार सुरू केला असून, प्रकाश आंबेडकर स्वतः मैदानात उतरले आहेत.

Pradeep Pendhare

Vanchit Bahujan Aghadi Rahuri : वंचित बहुजन आघाडीने राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार दिला असून, प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवाराच्या प्रचाराला देखील सुरवात केली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी, 'जर'-'तर'ची भाषा वापरत, महाविकास आघाडीतील एकोप्यावर शंका उपस्थित केली आहे. वंचित, महायुती आणि 'मविआ'च्या उमेदवारांसमोर आव्हान निर्माण करेल, अशी मतदारसंघात परिस्थिती असल्याचा दावाही आंबेडकर यांनी केला.

राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्यावतीनं प्राजक्त तनपुरे उमेदवार असते, तर वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवार द्यायचा की नाही, याचा विचार केला असता, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, "'मविआ'त (MVA) समन्वय अन् एकोपा नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने ऐनवेळी उमेदवार बदलला. त्यामुळे वंचिततर्फे उमेदवार देऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. वंचितचे उमेदवार गरीब मराठा कुटुंबातील आहेत. त्यांना चांगला पाठिंबा मिळत आहे."

भाजपने तनपुरे यांच्यावर दबाव टाकला, असे वाटत नाही. त्यांच्यावर 'ईडी'ची केस चालू आहे, म्हणून त्यांनी उमेदवारी केली नाही, असेही वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी तनपुरेंना उमेदवारी दिली असती, तर ते कदाचित निवडणुकीला उभे राहिले असते. त्यावेळी आम्ही उभे राहायचे की नाही, याचा विचार केला असता, अशी भूमिका आंबेडकर यांनी मांडली.

राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा सर्व प्रयत्न असफल ठरले. 30 पैकी 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उर्वरित 23 पैकी 16 उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली. त्यामुळे आता 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

निवडणूक रिंगणातील उमेदवार

अक्षय शिवाजी कर्डिले (भाजप), गोविंद खंडू मोकाटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष), संतोष एकनाथ चोळके (वंचित बहुजन आघाडी), अथर्व साहेबराव म्हसे, रावसाहेब सदाराम खेवरे, सूर्यभान दत्तात्रय लांबे, महेश केशव हापसे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT