Girish Mahajan Nashik Ganesha Visarjan sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Ganesha Visarjan : मुसळधार पावसात मिरवणूक सुरू, गिरीश महाजन यांनी वाजवला ढोल!

Girish Mahajan Nashik Ganesha Visarjan : नाशिकला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वाजवून गणेश विसर्जन मिरवणुकीला केली सुरुवात

Aslam Shanedivan

Summary :

  1. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा गणेश विसर्जन दिवशीही जोरदार बरसला.

  2. गणेश विसर्जन मिरवणुकीत वरुणराजाने भरभरून हजेरी लावली.

  3. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वाजवून मिरवणुकीची सुरुवात केली.

  4. पावसामुळे विसर्जन मिरवणुकीचा उत्साह दुप्पट झाला.

  5. ढोल-ताशांच्या गजरात भक्तांनी गणरायाला निरोप दिला.

Nashik News : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आज दिवसभर हजेरी लावली. गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच आज देखील वरूनराजा जोरदार बरसला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी गणरायाची आरती केली तसेच ढोल वाजून आजच्या मिरवणुकीला सुरुवात केली.

नाशिक शहरात आज दुपारी बाराला गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे मिरवणूक दीड तास उशिराने सुरू झाली. मिरवणुकीला विलंब झाल्याने काही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला.

वाकडी बारव येथून परंपरेप्रमाणे दुपारी बाराला मिरवणूकीस सुरुवात झाली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनाही ढोल वाजविण्याचा मोह आवरलं नाही. भर पावसात त्यांनी ढोल वाजून मिरवणुकीला सुरुवात करून दिली.

यावेळी मोजकेच मंडळांचे चित्ररथ उपस्थित होते. पाऊस सुरू असल्याने मंडळांच्या मिरवणुकीवर परिणाम झाला. दुपारी एक पर्यंत अवघ्या 25 मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत भाग घेतला. तोपर्यंत मिरवणूक गाडगे महाराज पुतळ्यापर्यंत पोहोचली होती.

जलसंपदा मंत्री महाजन, आमदार देवयानी फरांदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शहराध्यक्ष गजानन शेलार, माजी महापौर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गीते, भाजप नेते लक्ष्मण सावजी, सुनील केदार, प्रथमेश गीते, अजय बोरस्ते आदींचा विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि विविध शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

शहरात दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. गोदावरी सर्व नद्यांना धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नद्यांना पूर आल्यासारखे स्थिती आहे. या परिस्थितीत प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कक्षासह विविध सुरक्षात्मक उपाय केले आहेत. मिरवणूक वेळेत पूर्ण व्हावी यासाठी पोलिसांनी काटेकोर नियोजन केले आहे.

FAQs :

प्रश्न 1: गणेश विसर्जनावेळी पाऊस झाला का?
➡️ हो, दोन दिवस सतत पडणारा पाऊस विसर्जन मिरवणुकीदरम्यानही झाला.

प्रश्न 2: मिरवणुकीची सुरुवात कोणी केली?
➡️ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल वाजवून सुरुवात केली.

प्रश्न 3: पावसामुळे मिरवणुकीवर परिणाम झाला का?
➡️ नाही, उलट पावसामुळे उत्साह अधिक वाढला.

प्रश्न 4: मिरवणुकीत काय विशेष होतं?
➡️ ढोल-ताशांच्या गजरात भक्तांनी जल्लोषात विसर्जन केले.

प्रश्न 5: या विसर्जनाची वैशिष्ट्ये काय होती?
➡️ पावसात भक्तीभाव, ढोल-ताशा आणि मंत्र्यांचा सहभाग हे खास ठरले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT