Nashik : 'सगेसोयरे'शब्दावर अधिसूचना काढल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी आपले आंदोलन स्थगित केले. मात्र, अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर झाले नाही तर 10 फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटणार असल्याची चिन्ह आहेत. पण, सरकारच्या अधिसूचनेनंतर आनंदोत्सव साजरा करण्यावरून राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना डिवचले आहे. (Raj Thackeray On Maratha Reservation)
सगळ्या मागण्या मान्य पण आरक्षणाची मागणी बाकी आहे. जरांगे पाटलांना भेटायला गेलो होतो तेव्हाच त्यांना सांगितले होते, हा विषयी टेक्निकल आहे. राज्यात याबाबत निर्णय होणार नाही. मराठा बांधवांना मुंबईत आले. राजकीय अजेंडा म्हणून त्यांना मुंबईत आणले जाते. त्यांनी एकदा वस्तुस्थिती तपासून पाहिले पाहिजे. सरकारच्या अधिसूचनेनंतर कोणता विजय उत्सव साजरा केला. नेमकं काय झालं हे कळलं का?, जे झालंय त्याचा आनंदोत्सव करत होता. मग आता परत उपोषण कशासाठी, असा थेट सवाल राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीच्या कारवाई होत असल्याचा आरोप विरोध पक्ष भाजपवर करत आहेत. ईडीकडून नुकतीच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली. त्यावर राज ठाकरे यांनी थेट भाजपला इशारा दिला. सत्तेचा अमरपट्टा घेऊन भाजप आली नाही. मात्र, ईडीच्या आधारे जे भाजप करत आहे. तेच त्यांच्यावर उलटायला वेळ लागणार नाही. उद्या विरोधी पक्ष सत्तेत आलेवर ते देखील हेच करतील, असे ठाकरे म्हणाले.
प्रत्येक निवडणूक वेगळी असतेय. त्यामुळे राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर भाजपला फायदा होईल की नाही, सांगता येत नाही. बाबारी मशिद पडली बाॅम्बस्फोट झाले तेव्हा काँग्रेसच्या मतदारांनी भाजपला, शिवसेनेला मतदान केले होते. ते मतदान रागातून झाले होते. पुढच्या निवडणुकीला तसेच झाले असे नाही. त्यामुळे समाधान झालेले मतदार कसे मतदान कळतात हे या निवडणुकीत कळेल, असा दावा राज ठाकरे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.