Raj Thackeray On Ajit Pawar death case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Death Case : राज ठाकरे इतके दिवस कुठे होते? राष्ट्रवादीच्या आमदाराचा रोखठोक सवाल

Raj Thackeray On Ajit Pawar death case : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावर सुनेत्रा पवारांनी बोललं पाहीजे, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. राज ठाकरेंनी या प्रकरणात अनेक सवाल उपस्थितीत केले.

Ganesh Sonawane

Maharashtra politics : रोहित पवार यांनी बारामती पोलीस ठाण्यात VSR कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन केले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी व्यापक बळ मिळावे, यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थवर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज ठाकरे यांनी सांगितलं की, रोहित पवार यांच्या बोलण्यातून मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे त्यांनी तीन ठिकाणी एफआयआर नोंदवण्याचा प्रयत्न केला, पण तीन्ही ठिकाणी सरकारने तो घेऊ दिला नाही. FIR ला सरकार का घाबरतंय? असा रोखठोक सवाल राज ठाकरे यांनी उपस्थितीत केला. या प्रकरणात सरकारच संशयाचं भूत का नाचवत आहे, असा सवाल करत त्यांनी सरकारवर टीका केली. यावेळी राज ठाकरेंनी अनेक प्रश्न उपस्थितीत केले. या सगळ्या मुद्द्यांवर सुनेत्रावहिनींनी बोललं पाहिजे असही राज ठाकरे म्हणाले.

एकप्रकारे राज ठाकरे यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे, यावर काय वाटते असे माध्यम प्रतिनिधींनी राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांना विचारले असता त्यांनी 'राज ठाकरे इतके दिवस कुठे होते? असा सवाल उपस्थितीत केला. राज ठाकरे यांनी या प्रकरणात उडी घेतली हे आमच्यादृष्टीने ते फार काही महत्वाचे नाही. आमच्या पक्षातील प्रत्येक नेत्यापासून कार्यकर्त्याची हीच भूमिका आहे की, सत्य बाहेर आलं पाहीजे. चौकशी योग्य दिशेने झाली पाहीजे. जो यात दोषी असेल त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई होण्याच्या दृष्टीकोणातून चौकशी झाली पाहीजे अशी आमची सुरुवातीपासून भूमिका असल्याचं अनिल पाटील म्हणाले.

राज ठाकरे आता इतके दिवस नव्हते. रोहित पवार आल्यामुळे त्यांनी बोलायला सुरुवात केली असेल. त्यांच्या म्हणण्याकडे आम्हाला लक्ष्य देण्याची गरज नाही. राज ठाकरे तपास यंत्रणांमधले कोणी आहेत का? असा सवाल अनिल पाटील यांनी उपस्थिती केला.

अनिल पाटील यांनी रोहित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला व गंभीर आरोप केला. रोहित पवार यांना पक्षाचा ताबा हवा आहे, त्यासाठीच ते आमच्या नेत्यांवर नाहक खापर फोडत आहेत असा आरोप अनिल पाटील यांनी केला आहे. जर रोहित पवारांचे अजितदादांवर खरच प्रेम असेल, तर त्यांनी असे नाटक करण्याची गरज नाही. रोहित पवार स्वतः कोणतीही तपास यंत्रणा नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे जर काही ठोस पुरावे असतील, तर त्यांनी ते रडगाणे न गाता थेट तपास यंत्रणांकडे सुपूर्द करावेत असा सल्ला आमदार पाटील यांनी दिला.

रोहित पवार यांना जर सुनेत्रा पवार यांच्याबद्दल इतकीच आत्मीयता होती, तर जेव्हा त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होत होत्या, तेव्हा त्यांनी त्यांची साथ सोडून जायला नको होते. अमोल मिटकरी असोत किंवा आम्हा सर्व आमदारांची हीच मागणी आहे की, या घटनेचा पूर्ण तपास व्हावा आणि सत्य बाहेर यावे असे अनिल पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT