नाशिक : भाजपचे (BJP) खासदार बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांनी सबुरीने घेताना ‘रामाच्या चरणी जो जात असेल त्याला जाऊ द्यावे, विरोध करण्याचे काहीच कारण नाही’ असा सल्ला देताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौराचे समर्थन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केले. (Raj Thackeray Ayodhya visit)
नाशिक मध्ये माध्यमांशी ते बोलतं होते. भाजप खासदार सिंग यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करताना मोर्चा देखील काढला होता, त्यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, खासदार सिंग हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध का करतं आहे. हे माहिती नाही. माझे त्यांच्याशी बोलणे झालेले नाही. परंतु श्रीराम चरणी जात असेल त्याला जाऊ द्यावं.
राज्य सरकार व मनसे मधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, राज यांनी सरकारकडून अपेक्षा ठेवू नये, राज्य सरकारने मर्यादा सोडल्या आहेत. जे सरकार लांगूलचालन करत आहे. हनुमान चालिसा म्हणण्याचे फक्त घोषित केल्यानंतर खासदार, आमदारांवर देशद्रोहाचा गुन्हा लावून त्यांना बारा दिवसांसाठी जेलमध्ये ठेवले जाते, त्या सरकारकडून अपेक्षा ठेवणे पूर्णपणे चुकीचे आहे. राज्य सरकार विरोधात आम्ही लढत आहोत. राज ठाकरे यांनी देखील लढण्याचा सल्ला त्यांनी दिला.
उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने मुंबईत कार्यालय सुरु करण्यात आल्याने शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून टीका केली जात आहे. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने मुंबईत कार्यालय सुरु केल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. मुंबईसह महाराष्ट्र पॉवरफुल्ल आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या कार्यालयाचा महाराष्ट्रावर काही एक परिणाम होणार नाही. महाराष्ट्रावर काही परिणाम झाल्यास महाविकास आघाडी सरकारमुळे होईल अशी टीका करताना जेल मधून काम करणाऱ्या मंत्र्यांच्या दुराचारामुळे राज्य सरकार संकटात येईल असा टोला लगावला.
--------
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.