MP Brijbhushan & Sadhus at Ayodhya Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राज ठाकरे, अयोध्या सोडा विमानतळाबाहेर पाय ठेऊन दाखवा!

अयोध्येत संकटमोचन सेना आणि खासदार ब्रृजभूषण यांनी काढली हजारो समर्थकांची रॅली.

Sampat Devgire

अयोध्या : राज ठाकरे (Raj Thakre) यांनी केवळ राजकारणासाठी उत्तर भारतीय (North Indians) नागरिकांवर अतोनात अत्याचार (Attrocity) केले आहेत. ते आम्ही कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांनी आधी जाहीर माफी मागावी. त्यानंतर अयोध्येत प्रवेशाचा विचार करू. अन्यथा त्यांना विमानतळाबाहेर पाय देखील ठेऊ देणार नाही, असा इशारा (Warns Raj Tahkre) आज देण्यात आला.

भारतीय जनता पक्षाचे अयोध्येतील खासदार ब्रृजभूषण, संकट मोचन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत संजयदास माहाराज, महंत हेमंतदास महाराज यांसह विविध धार्मिक नेते व सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आज अयोध्येत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर अयोध्येत तापलेले वातावरण आज शिगेला पोहोचला. यावेळी काढलेल्या रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. त्यानंतर झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांना इशारा देण्यात आला.

यावेळी झालेल्या मेळाव्यात खासदार ब्रृजभूषण यांनी राज ठाकरे यांच्यावर टिका केली. ते म्हणाले, राज ठाकरे यांच्या पक्षाने महाराष्ट्रात सातत्याने उत्तर भारतीय नागरिकांचा अपमान केला. त्यांच्याबाबत अवमानकारक भाषेचा वापर केला. रोजगारासाठी गेलेल्या गरीब उत्तर भारतीय नागरिकांना आपल्याच देशात मनसेकडून मारझोड करण्यात आली. वाईट बोब म्हणजे राज ठाकरे त्यावर खुष होत होते. हे कोणीही उत्तर प्रदेशातील व्यक्ती सहन करू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधात आहोत.

याबाबत महंत हेमंतदास म्हणाले, अयोध्या ही श्रीरामाची नगरी आहे. तीथे प्रत्येकाचे स्वागतच केले जाते. मात्र राज ठाकरे एक राजकीय व्यक्ती आहे. त्यांनी महाराष्ट्रात उत्तर भारतीय नागरिकांबाबत अशोभनीय कृत्ये केली आहेत. त्यांनी आधी माफी मागावी. त्यानंतर त्यांच्या दौऱ्याचा विचार करता येईल. अन्यथा त्यांना अयोध्या तर खुप लांबची गोष्ट आहे, त्यांना विमानतळाबाहेर पाय देखील ठेऊ दिला जाणार नाही. याबाबत नागरिकांच्या भावान खुप तीव्र आहेत.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT