Raj Thakre
Raj Thakre Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राज ठाकरे भाजप-मनसे युतीचा निर्णय सोमवारी नाशिकमध्ये घेणार?

Sampat Devgire

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा गड भक्कम आहे का याची चाचपणी करण्यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakre) सोमवार पासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येत आहेत. भाजप नेत्यांनी मनसे-भाजप युती होणार नसल्याचे वांरवार सांगितले असले तरी स्थानिक नेत्यांचा युतीचा आग्रह असल्याने या दौऱ्यात ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान नवीन नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरे दोन महिन्याच्या कामकाजाचा हिशोब मागणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे.

पुढील वर्षाच्या प्रारंभी महापालिकेच्या निवडणुका होत आहे. त्यामुळे सर्वंच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या तयारीत मनसेचे विशेष लक्ष नाशिककडे आहे. त्याला कारण म्हणजे मनसेला नाशिककरांना एकेकाळी तीन आमदार व महापालिकेची सत्ता दिली परंतु सन २०१७ च्या निवडणुकीत मनसेला हवे तसे काम करता आले नाही त्यामुळे नगरसेवकांची संख्या चाळीस वरून पाचपर्यंत आली. आता पाच चे पंचवीस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दोन महिन्यांपूर्वी कार्यकारिणीतील प्रमुख पदांमध्ये बदल करण्यात आला.

हा बदल मनसेच्या कार्यकर्त्यांच्या पचनी पडला नाही. त्यामुळे पक्षात कुरबुरी सुरु झाल्या आहेत. १२२ शाखाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. ही बाब कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारी आहे. ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा मनसे-भाजप युतीची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे मनसेकडूनचं युतीच्या चर्चेला हवा घातली जात आहे. भाजपसोबत युती झाली तरचं पक्षाला सत्तेच्या राजकारणात ‘अच्छे दिन’ असे कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी युती होणार नसल्याचे जाहीर केले असले तरी मनसेकडून युतीसाठी रेटा लावला जात असल्याने राज ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT