Rajabhau Waje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rajabhau Waje : नाशिकमध्ये कार्यरत कंपन्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी किती CSR खर्च केला? खासदार राजाभाऊ वाजेंनी संसदेत उचलला मुद्दा

Rajabhau Waje, Nashik CSR Fund : नाशिकमध्ये नफा, पण नाशिकच्या विकासासाठी किती निधी?' CSR बाबत खासदार राजाभाऊ वाजे यांचा संसदेत थेट प्रश्न. लोकसभेतील अतारांकित प्रश्नाद्वारे मागितला हिशेब.

Ganesh Sonawane

Nashik Politics : नाशिक जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मोठ्या उद्योग आणि कंपन्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी प्रत्यक्षात किती निधी खर्च करतात, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत उपस्थित केला.

नाशिकमध्ये कार्यरत कंपन्यांनी येथील संसाधनांचा वापर करून नफा कमावला असेल, तर त्यांच्या CSR निधीचा योग्य वाटा नाशिकच्या विकासासाठी खर्च होणे ही त्यांची सामाजिक जबाबदारी असल्याचं खासदार राजाभाऊ वाजे यांनी म्हटलं.

लोकसभेतील अतारांकित प्रश्नाद्वारे खासदार वाजे यांनी मागील पाच आर्थिक वर्षांतील नाशिक जिल्ह्यात कार्यरत कंपन्यांनी निर्माण केलेला एकूण CSR निधी, त्यापैकी नाशिक जिल्ह्यात खर्च झालेला निधी, इतर जिल्ह्यांकडे वळविण्यात आलेला निधी तसेच कंपनीनिहाय, वर्षनिहाय आणि क्षेत्रनिहाय तपशील केंद्र सरकारकडे मागितला.

यावेळी त्यांनी सरकारचे लक्ष वेधत म्हटले की, नाशिक हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा औद्योगिक, कृषी व निर्यात जिल्हा असूनही शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, कौशल्य विकास आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात अनेक समस्या कायम आहेत. अशा परिस्थितीत नाशिकमध्ये कार्यरत कंपन्यांनी आपल्या CSR निधीतून स्थानिक विकासासाठी नेमका किती वाटा दिला आहे, हे जनतेसमोर येणे आवश्यक आहे.

खासदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले की, "नाशिकमध्ये उद्योग उभे राहतात, नफा कमावतात आणि येथील संसाधनांचा वापर करतात, त्यामुळे त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचा मोठा वाटा नाशिकच्या विकासासाठीच खर्च झाला पाहिजे. नाशिकमधील प्रत्येक कंपनीने स्थानिक शिक्षण, आरोग्य, शेतकरी, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी किती CSR निधी दिला, याबाबत पारदर्शकता असणे आवश्यक आहे.

खासदार वाजे यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नामुळे नाशिकमध्ये कार्यरत कंपन्यांच्या CSR निधीचा स्थानिक विकासासाठी किती उपयोग होतो, हा महत्त्वाचा मुद्दा आता संसदेपासून जनतेपर्यंत पोहोचला असून, भविष्यात जिल्ह्याला अधिक CSR निधी मिळवून देण्यासाठी हा प्रश्न निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT