Accident News : धार्मिक यात्रेसाठी गेलेल्या नाशिकमधील बागलाण तालुक्यातील भाविकांचा राज्यस्थानमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये संदीप मगर (55), महेश मगर (45), दीपक मगर (65) यांच्यासह एक जणाचा मृत्यू झाला आहे. तर,25 जण जखमी आहेत. यातील आठ जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे.
मगर कुटुंबीय आणि इतर भाविक सीकर येथील खाटूश्यामजींचं दर्शन घेतल्यानंतर चित्तौडगढ जिल्ह्यातील सावळिया सेठ मंदिराकडं दर्शनासाठी निघाले होते.मात्र, जयपूर-अजमेर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर जयपूरजवळील बगरू पुलावर शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर जखमीना जयपूर येथील सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्देवाने हा अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर ट्रॅव्हल्सचा चालक महाराष्ट्रातील अपघातग्रस्त प्रवाशांना सोडून घटनास्थळावरून फरार झाला. दरम्यान, या अपघाताची माहिती नाशिकमध्ये समजताच अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला . कुटुंबीय मृत्यदेह ताब्यात घेण्यासाठी राजस्थानकडे रवाना झाले.
घटनेची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने मदतकार्याच्या अनुषंगाने पुढाकार घेत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. अपघातातील मृत व्यक्तींचे शवविच्छेदन लवकरात लवकर पूर्ण करून त्यांचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना द्याव्यात, अशी विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.