Nandurbar News: आगामी विधानसभेत शहादा-तळोदा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असल्याचे देवमोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी स्पष्ट करीत आगामी विधानसभेचे रणशिंग फुंकले.
शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघात यंदा भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता वाढली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार राजेश पाडवी यांचे डोकेदुखी वाढणार आहे. राजेंद्रकुमार गावित हे डॉक्टर विजयकुमार गावित यांचे बंधू असून लोकसभेच्या मुलाखती दरम्यान उमेदवारीसाठी त्यांनीही मुलाखत दिली होती. आता त्यांनी विधानसभेसाठी मोर्चबांधणी सुरु केली आहे.
तालुक्यातील सहकार तत्वावरील अनेक प्रकल्प सध्या बंद आहेत. त्यामुळे रोजगार शोधण्याची वेळ मतदार संघातील नागरिकांवर आल्याची खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व मतदार संघातील मूलभूत समस्यांच्या पाढा वाचला.
शेतकरी बांधवांनाही अनेक समस्यांनी ग्रासले आहे. ठिबकचे अनुदान नाही ,कर्जमाफीचे पैसे अद्यापही काहींना मिळाले नाही, त्या योजना सुरु आहे. त्यांचा लाभ मिळवण्यासाठी विलंब होत आहे. यासह अनेक समस्यांच्या पाढा उपस्थित कार्यकर्त्यांकडून वाचण्यात आला.
त्यामुळे या मतदासंघात आता सर्व समावेशक सर्वांना सोबत घेऊन चालणारा, विकासाला चालना देणारा आमदार हवा अशी कार्यकर्त्यांनी भावनिक साद घातल्याने शहादा तळोदा मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असल्याचे राजेंद्रकुमार गावित यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.