Raju Shetty
Raju Shetty Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raju Shetty News: जिल्हा बँकेवर दरोडा घालणाऱ्यांना सोडणार नाही!

Sampat Devgire

मालेगाव : (Malegaon) नाशिक जिल्हा बँकेवर (NDCC Bank) दरोडा घालणारे नामानिराळे आहेत. बँकेचे प्रशासनाकडून मात्र शेतकऱ्यांना (Farmers) त्रास दिला जात आहे. धनदांडग्यांना विनंती व शेतकऱ्यांवर कारवाई हे खपवून घेणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी दिला आहे. (NDCC Bank shall take action against leaders for loan recovery)

जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुली विरोधात मालेगावच्या पोलिस कवायत मैदानावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे बिऱ्हाड आंदोलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री दादा भुसे यांना इशारा देण्यात आला.

यासंदर्भात शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर सरळ व्याजाने आठ टक्के व्याज आकारणी करणे, सक्तीची वसुली थांबविणे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बँकेच्या नावे झाल्या आहेत त्यांना स्थगिती देवून एक रकमी तडजोड योजनेत सहभागी होण्याची संधी देण्याचे आश्‍वासन सहकारमंत्री अतुल सावे आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. त्यामुळे हे आंदोलन सोमवारी सायंकाळी मागे घेण्याची घोषणा स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली.

यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी आर-पारची लढाई घेऊन रस्त्यावर आले. दोन महिने शासनाने दखल घेतली नाही. दोन दिवसापुर्वी दखल घेतली. कालपासून बिऱ्हाड आंदोलनाला शेतकऱ्यांचा पाठिंबा असल्याचे लक्षात आल्यानंतर चक्र फिरायला सुरुवात झाली.

जिल्हा बँकेवर दरोडा घालणारे नामानिराळे आहेत. शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे. धनदांडग्यांना विनंती व शेतकऱ्यांवर कारवाई हे खपवून घेणार नाही. सहकारमंञ्यांनी श्री. भुसे यांच्या माध्यमातून आश्‍वासन दिले आहे. सरकारने दिलेले शब्द पाळले नाही. शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर १६ फेब्रुवारीला ठाण्याला मुख्यमंत्र्यांच्या दारात सर्व शेतकरी धडकतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT