Rajya Sabha Election
Rajya Sabha Election  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

महाडिकांचा विजय : गिरीश महाजनांच्या पीएने १ लाखांची पैज जिंकली; जळगावमध्ये सेलिब्रेशन

कैलास शिंदे

मुंबई : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या राज्यसभा निवडणुकीत (RaJyasabha Election) भाजपचे (BJP) पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे तिन्ही उमेदवार विजयी ठरले आहेत. महाविकास आघाडीची तब्बल ११ मत फोडतं भाजपने तिसरी आणि धोक्याची जागा जिंकली आहे. या मुंबईत या विजयाच्या सेलिब्रेशननंतर आणखी एक विजयी सेलिब्रेशन आज दुपारी जळगावमध्ये पार पडले. (Rajya Sabha Election Latest News)

मागील काही दिवसांपासून भाजपकडून तिन्ही उमेदवार विजयी होतील असा दावा केला जात होता. याच दाव्यावर काही ठिकाणी पैजा देखील लागल्या होत्या. भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख यांनीही या दाव्यामध्ये उडी घेत १ लाख रुपयांची पैज लावली होती आणि ती स्वीकारण्याचं खुलं आव्हानही त्यांनी दिले होते. देशमुख यांनी दिलेले हे आव्हान कोणं स्वीकारणार? अशी चर्चा होती.

या दरम्यान देशमुख यांचे हे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वीकारण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल पाटील यांने देशमुख यांचे आव्हान स्वीकारले. त्यांनी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होणारचं असा दावा केला. त्यामुळे ही एक लाख रुपयांची शर्यत कोण जिंकणार याकडे लक्ष लागले होते. (Rajya Sabha Election Latest News)

दरम्यान पहाटे ४ वाजता राज्यसभेचा निकाल लागला. यात महाविकास आघाडीचे संजय पवार पराभूत झाले आणि भाजपचे धनजंय महाडीक विजयी झाले. अरविंद देशमुख यांनी पैज जिंकली होती. दिलेल्या शब्दानुसार, राहुल पाटील यांनी दुपारी १ वाजता १ लाख रुपयांचा धनादेश आमदार गिरीश महाजन यांच्या कार्यालयात अरविंद देशमुख यांना देण्यास आणला. मात्र देशमुख यांनी हा चेक न स्विकारता त्यांना तो परत केला व पैजेच्या विजयाचा केवळ एक रूपया घेतला.

याबाबत बोलताना देशमुख म्हणाले, प्रश्‍न पैशांचा नव्हता. मात्र आमचे नेते गिरीश महाजन यांच्यावर आपला विश्‍वास होता आणि तो खरा ठरला आहे. तर राहूल पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रितपणे कार्य केले, तसेच आमचे नेते अजित पवार यांच्यासह सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केल्याने संजय पवार निवडून येतील असा विश्‍वास होता. परंतु भाजपला यश मिळाले, आपण भाजपचे अभिंनदन करीत आहोत. पैज हरल्यामुळे आपण एक लाख रूपये रकमेचा धनादेश दिला परंतु देशमुख यांनी मोठ्या मनाने तो स्विकारला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT