Raksha Khadse, BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raksha khadse Politics: राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले निवडणूक जिंकण्याचे "ते" तंत्र

Raksha Khadse politics, It is important to win the election, because the party workers is important in the election-केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणतात, कार्यकर्त्यांमुळेच मी राज्यमंत्री झाले

Sampat Devgire

Raksha Khadse News: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा काल पहिल्यांदाच मतदार संघात सत्कार झाला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अतिशय उत्साहाने स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हॅटट्रिक केली. त्या अतिशय मोठ्या फरकाने जिंकल्या. या विजयाचे रहस्य त्यांनी काल कार्यकर्त्यांसमोर प्रकट केले.

राज्यमंत्री खडसे म्हणाल्या यंदाची लोकसभा निवडणूक अतिशय अटीतटीची होती. या निवडणुकीची मी खूप आधीपासून तयारी केली होती. ही निवडणूक मी ग्रामपंचायत निवडणुकीसारखी लढले. त्यात असंख्य कार्यकर्ते आणि मतदार माझ्या बाजूने उभे राहिले.

कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमामुळेच मी खासदार झाले. केंद्रात राज्यमंत्री देखील झाले. भारतीय जनता पक्षाला आगामी निवडणुका जिंकण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे प्रत्येक निवडणूक ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे लढली पाहिजे.

ग्रामपंचायतीप्रमाणे निवडणूक लढली तरच आगामी विधानसभा निवडणुकीत आपण यशस्वी होऊ. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील हेच तंत्र राबवावे लागेल. तरच आपण त्या निवडणुका जिंकू.

तसे करण्यासाठी कार्यकर्त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले तरच निवडणुकीत विजय मिळतो. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने राबविलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्यात कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन भारतीय जनता पक्षाचे कामकाज आणि योजना मतदारांना सांगितल्या पाहिजे. तसे केले तर तरच हमखास विजय होता येईल.

मतदारसंघाच्या विकासासाठी विविध स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. आगामी एक वर्षात जळगाव साठी महत्त्वाचा प्रश्न असलेले केळीचे क्लस्टर घोषित होईल, असा दावा त्यांनी केला. बऱ्हाणपूर -अंकलेश्वर महामार्गाच्या निविदा लवकरच प्रसिद्ध होणार आहेत, असे राज्यमंत्री खडसे म्हणाल्या.

पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, नंदकिशोर महाजन, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रंजना पाटील, केतकी पाटील, प्रल्हाद पाटील, भरत महाजन, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ, श्रीकांत महाजन आदी वरिष्ठ पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT