Eknath Khadse, Raksha Khadse, Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raksha Khadse : बालेकिल्ल्यातच मंत्री रक्षा खडसेंचं राजकीय वजन घटलं, पराभवाने बसला मोठा हादरा..

Muktainagar municipal elections : मंत्री गिरीश महाजन यांनी देखील मुक्ताईनगरच्या पराभवाचे खापर खडसे कुटुंबावर फोडले आहे. मुक्ताईनगरमधील पराभवाने भाजपला बालेकिल्ल्यातच उतरली कळा लागल्याचे चित्र आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon Politics : मुक्ताईनगर हा खडसे कुटुबीयांचा बालेकिल्ला आहे. पण नगरपालिका निवडणुकीत रक्षा खडसे यांनी जीवाचे रान करुनही त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने मुक्ताईनगरमध्ये भाजपला आता उतरती कळा लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी देखील मुक्ताईनगरच्या पराभवाचे खापर हे रक्षा खडसे व एकनाथ खडसे या सासरे व सुनेवर फोडले. तिथे भाजपचा नव्हे तर खडसे कुटुंबाचा जनतेने पराभव केल्याचे गिरीश महाजन म्हणाले.

मुक्ताईनगरची लढाई भाजपच्या केंद्रीय मंत्री रक्षा खडसे व शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील दोघांसाठी अस्तित्वाची लढाई होती. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार भावना महाजन यांचा पराभव करत शिवसेनेच्या संजना चंद्रकांत पाटील यांनी 2486 मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. या निकालाने रक्षा खडसेंना मोठा हादरा बसला.

नगरपंचायतच्या 17 प्रभागांपैकी शिवसेनेने 10 नगरसेवक पदे जिंकत नगराध्यक्षपदासह एकूण 11 जागांवर विजय मिळवला. भाजपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले तर 2 जागांवर अपक्ष उमेदवारांचा विजय झाला.

४ डिसेंबर २०१७ पासून मुक्ताईनगर नगरपंचायत अस्तित्वात आली. पहिली पंचवार्षिक निवडणूक जुलै २०१८ मध्ये झाली होती. तेव्हा भाजपने पहिल्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवली होती. भाजपच्या १७ पैकी १३ जागा निवडून आल्या होत्या. शिवसेनेला त्यावेळी केवळ तीन जागांवर विजय मिळवता आला होता. परंतु यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने भाजपवर मात केली. हा निकाल पाहाता मुक्ताईनगरमध्ये अर्थात बालेकिल्ल्यातच रक्षा खडसे यांचे राजकीय वजन कमी झाल्याचे दिसते.

खऱ्या अर्थाने २०१९ नंतर नगरपरिषदेचे चित्र पालटले. शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांनी २०१९ मध्ये अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक जिंकली. त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये आमदार एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजप नगरसेवक कधी भाजपचे, तर कधी खडसे समर्थक अशा दुहेरी भूमिकेत दिसून आले. बदलत्या भूमिका साकारताना नगरसेवकांमध्ये बेबनाव सुरू झाला. त्यातुनच मुक्ताईनगर नगरपंचायतीत भाजपची एकहाती सत्ता हळूहळू कमजोर झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT