Ahilyanagar District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
राम शिंदे यांच्या या भूमिकेमुळे जिल्हा बँकेसाठी महायुतीकडून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच हाती सूत्रे राहणार असल्याचे सांगितले जाते. मविआकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात निर्णय प्रक्रियेत असतील. एकंदर मंत्री विखे पाटील आणि थोरात यांच्याच हातात जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या बिनविरोधाचे सूत्रे असणार आहेत.
राम शिंदे (Ram Shinde) यांनी, उमेदवार का करत नाही, हे जाहीरपणे सांगताना, महाराष्ट्र विधान परिषदेच्या संवैधानिक पदाची जबाबदारी असल्याने, त्याची जाणीव आहे. म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेचा सभापती म्हणून, माझ्यावर असलेल्या घटनात्मक पदाची, प्रतिष्ठा आणि निष्पक्षपता जपणे ही माझी जबाबदारी आहे. तसेच व्यापक परिस्थितीचा आणि सर्वांगिक बाबाची शांतपणे विचार केल्यानंतर, माझ्या अंतर आत्म्याच्या आवाजाने मला असे सांगितले की, अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करू नये, असा निर्णय जाहीर केला.
राम शिंदे यांनी हा निर्णय जाहीर करताना, हा निर्णय कोणत्याही राजकीय दबावातून घेतलेला नाही, हे स्पष्ट केले. तसेच राजकीय महत्त्वकांक्षेपेक्षा घटनात्मक पदाची प्रतिम सर्वोच्च आहे, हे मी मानणारा कार्यकर्ता आहे, असेही त्यांनी सांगितले.
या निर्णय माझा व्यक्तिगत आहे, पुढच्या राजनीतीचा भाग आहे असे सांगून, राम शिंदे यांनी सूचक असा इशारा दिला. माझ्या निवडणुकीपेक्षा मी माझ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत अधिक गतीने, वेगाने, अधिक ताकदीने काम करत असतो. जामखेड नगरपालिकेच्या निवडणुकीत त्याची अनुभूती कार्यकर्त्यांनी घेतली आहे. या निवडणुकीत मी जरी अर्ज भरत नसलो, तरी माझं पूर्ण लक्ष राहणार असल्याचे राम शिंदे यांनी जाहीर केले.
जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियात महायुतीकडून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सभापती प्रा. राम शिंदे राहतील, असे सुजय विखे पाटील यांनी जाहीरपणे सांगितले होते. परंतु राम शिंदे यांनी निवडणुकीतून माघार घेत या निवडणुकीत डबल गतीने लक्ष घालणार असल्याचे जाहीर करून निवडणूक प्रक्रियेत राहणार असल्याचे थेट संकेत दिले.
या निवडणुकीत कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम करणार असल्याचे जाहीरपणे राम शिंदे यांनी सांगितले. परंतु राम शिंदे यांनी माघार घेताच, त्यांच्याकडील संवैधानिकपदाची आणि तिसऱ्या अपत्याच्या मुद्याच्या चर्चेने जोर धरला आहे. या चर्चा असल्या तरी राम शिंदे जिल्हा बँकेसाठी महायुतीकडून विचार प्रक्रियेत असणार की, मंत्री विखे पाटील निर्णय प्रक्रिया पुढे नेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.