Ramdas Athawale
Ramdas Athawale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ramdas Athawale: रामदास आठवलेंची भविष्यवाणी, बिहार सरकार कोसळणार!

Sampat Devgire

नाशिक : बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) हे लालूप्रसाद यादव यांच्यासोबत होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासमवेत आले. आता ते पुन्हा गेले असले, तरीही श्री. मोदी यांच्यासोबत पुन्हा येतील, असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी नितीशकुमार यांचे आमदार फुटतील आणि बिहारचे कोसळेल असा दावा आज येथे केला. (Ramdas Athawale deemands mlc from new state Government)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे नितीनकुमार, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार असे कितीही चेहरे आले, तरीही ते टिकणार नाहीत, असेही सांगायला देखील श्री. आठवले विसरलेले नाहीत.

नाशिकच्या दौऱ्यावर असताना सरकारी विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना श्री. आठवले म्हणाले, की भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांना संपवतो, असा करण्यात येत असलेला आरोप चुकीचा आहे. माझा पक्ष संपवण्यापेक्षा मी पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत असताना भारतीय जनता पक्ष मदत करत आहे.

आमदार अन मंत्रीपद हवयं

रिपब्लिकन पक्षाच्या विभाजनावेळी रा. सू. गवई यांच्याकडे दोन खासदार असल्याने त्यांना उगवता सूर्य हे निवडणूक चिन्ह मिळाले. पक्ष माझ्या बाजूने असतानाही चिन्ह मिळाले नाही. हा दाखला देत श्री. आठवले यांनी निवडणूक आयोगाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळेल, असा दावा केला.

ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांची ‘खरी शिवसेना‘ आणि उद्धव ठाकरेंची ‘बरी शिवसेना‘ असे सांगून श्री. आठवले म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी पुढच्या महिन्यात उर्वरीत शपथविधी होईल, असे जाहीर केले आहे.

राज्यातील सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आहे. एवढेच नव्हे, तर २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे, भारतीय जनता पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) महायुतीला २०० जागा मिळतील. शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे बोलणे झालेले आहे. मंत्रीमंडळाच्या विस्तारात आमच्या पक्षाला एक मंत्रीपद देण्याचा विचार करु, असे त्यांनी सांगितले आहे. आता नव्याने होणाऱ्या १२ आमदारांमध्ये आम्हाला एक विधानपरिषद सदस्यपद आणि महामंडळाचे अध्यक्ष-उपाध्यक्षपद मिळायला हवे, अशी आमची भूमिका आहे.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT