Extortion Case Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Extortion Case : मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्याचा निकटवर्तीय प्रकाश लोंढेला अटक; खंडणीच्या गुन्ह्यात मुलगा फरार!

Ramdas Athawale Prakash Londhe Nashik Police : नाशिक शहरातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली. सत्ताधारी पक्षांची संबंधित दोघांना अटक केली. गेले काही दिवस शहरात राजकीय गुन्हेगारी शिगेला पोहोचली होती.

Sampat Devgire

Nashik crime News: खंडणीच्या मागणीसाठी बारमध्ये घुसून बारचालकावर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये एक ग्राहक देखील जखमी झाला होता. विशेष म्हणजे गोळीबार करणारा आरोपी माजी नगरसेवक आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा निकटवर्तीय असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत गोळीबार करणाऱ्या प्रकाश लोंढे याला अटक केली आहे. तर, त्याचा एक मुलगा फरारी असून एकाला अटक केली आहे.

बुधवारी पोलिसांनी खंडणी, खुणाचा प्रयत्न अशा गंभीर प्रकरणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा माजी नगरसेवक प्रकाश लोंढे, त्याचा मुलगा दीपक लोंढे, संतोष पवार आणि अमोल पगारे यांना अटक केली. ही कारवाई 'पीएल' ग्रुप नावाने सुरू असलेल्या टोळीला मोठा दणका आहे.

रविवारी (ता. 5) सातपूरच्या ऑरा बार ॲड रेस्टॉरंट येथे खंडणीसाठी ग्राहकांनी मालकावर भूषण लोंढे यांनी गोळीबार केला होता.

गंगापूर रोडसह विविध भागात दहशत निर्माण करून खंडणी क्षेत्र सुरू करण्यासाठी 'पीएल' ग्रुप प्रयत्नशील होता. यामध्ये माजी नगरसेवक प्रकाश लोंढे राजकीय प्रभावाचा वापर करीत होता. मुलगा भूषण लोंढे टोळी चालवून प्रत्यक्ष गुन्हे घडवीत होता. दुसरा मुलगा दीपक लोंढे हा देखील यामध्ये सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आता या प्रकरणात थेट केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या निकटवर्तीयाला अटक झाली आहे. भाजपपाठोपाठ महायुतीच्या दुसऱ्या सहकारी पक्षाच्या नेत्यांवर कारवाई झाल्याने. नाशिक शहरात तो चर्चेचा विषय आहे.

शहरात गुन्हेगारी वाढल्याने सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शहरातील आमदारांनी तक्रार केली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, शहरात सातत्याने घडत असलेल्या घटनांमुळे पोलिस प्रशासनाचा धाक उरला नाही का? असा सवाल उपस्थित केला जात होता.

सहा महिन्यात 48 खून

राजकीय आणि विशेषतः सत्ताधारी पक्षांच्या आशीर्वादातून अनेक गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेबव ठाकरे पक्षाने केला आहे. यापूर्वीच भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि बाळासाहेब पाटील यांना खून प्रकरणी अटक झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप अडचणीत आला आहे. शहरात गेल्या सहा महिन्यात ४८ खून झाले आहेत. गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांवर दबाव आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT