Ramdas Athawale 2 Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ramdas Athawale : आठवलेंनी आजचं मरण उद्यावर ढकललं; गटबाजीवर 'असा' काढला तोडगा

Ramdas Athawale settled the dispute for the post of RPI Nagar District President : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातील नगर जिल्हाध्यक्ष पदावर मंत्री रामदास आठवले यांनी 'प्रभारी' जिल्हाध्यक्ष देत तात्पुरता तोडगा काढला आहे.

Pradeep Pendhare

Ahmenagar News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्षांना आणि पक्षश्रेष्ठींना संघटना एकसंघ ठेवण्याचं आव्हान आहे. प्रत्येक पक्षात फाटाफुटीचं ग्रहण लागलं आहे. यात फक्त सोयीच्या राजकारणाचा सूर आवळला जातोय.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात प्रत्येक जिल्ह्यात गटबाजी उफाळली आहे. पु्ण्यापाठोपाठ नगर जिल्ह्यातील संघटनेत गटबाजी दिसते. नगरमधील गटबाजी शांत करण्यात पक्षाचे अध्यक्ष तथा मंत्री रामदास आठवले यांना काहीसं यश आलं असलं, तरी त्यांनी काढलेला तोडगा म्हणजे, आजचं मरण उद्यावर ढकलण्यासारखं आहे, असं संघटनेत बदक्या आवाजात बोललं जात आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात अलीकडच्या काळात फुटीचं सावट आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसंग्राममध्ये फूट पडली. थेट दोन गट झाले. महायुतीत सत्तेत असलेल्या आरपीआयमध्ये देखील असेच गट पडतील, अशी चर्चा आहे. कारण, राज्यातील संघटनेमध्ये गटबाजी वाढली आहे. नगर आणि पुणे मधील गटबाजी अधिक उफाळून आली आहे.

नगरमधील गटबाजीवर पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तोडगा काढला आहे. (RPI) जिल्हाध्यक्षपदावरून नगर जिल्ह्यातील संघटनेत दोन गट पडले होते. रामदास आठवले संविधान सन्मान मेळाव्यासाठी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी संघटनेतील गटबाजीची गंभीर दखल घेतली. संघटनेची बैठक घेत, तोडगा काढला. जिल्हाध्यक्षाचं प्रभारी कारभार सुनील साळवे यांच्या हाती दिली.

काय होता वाद

संजय भैलुमे यांनी नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी असून, कार्यकारिणी बरखास्त नसल्याचा दावा केला होता. राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे व श्रीकांत भालेराव यांनी बैठक घेऊन कार्यकारिणी बरखास्त करत सुनील साळवे यांच्याकडे प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. यावरुन पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. गटबाजी चव्हाट्यावर आली होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मंत्री रामदास आठवले यांनी या वादावर आता पडदा टाकत जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक होईपर्यंत प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे राहतील, असे स्पष्ट केले.

दोन महिन्यांनी निवडणूक

रामदास आठवले म्हणाले, अनेक वर्षापासून जिल्हाध्यक्ष म्हणून सुनील साळवे काम करत आहे. इतरांना देखील संधी मिळावी म्हणून सभासद नोंदणीनंतर दोन महिन्यांनी निवडणूक घेतली जाणार आहे. निवडणुकीने नवीन दक्षिण जिल्हाध्यक्ष निवडला जाणार आहे आणि नवीन कार्यकारणी जाहीर होईल. वाकचौरे आणि भालेराव यांनी कार्यकारिणी बरखास्तच्या घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT