नाशिक : नाशित शहरात आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सामूहिक राष्ट्रगायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या समारोपाला देशाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उपस्थिती लावली होती. मात्र, कार्यक्रमात सुरू असतांना अचानक पाऊस आल्याने कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. पाऊस सुरू झाला असल्याने विद्यार्थी पावसात तसेच भिजत राहिले होते. त्यावेळी मंत्री दानवे मात्र छत्रीखाली उभे राहिलेले दिसत आहेत. त्यांच्या या फोटोमुळे ते ट्रोल होत आहेत. (Raosaheb Danve Latest News Nashik)
या कार्यक्रमाचे काही फोटो हे दानवे यांनी आपल्या ट्विटरवर देखील शेअर केले आहेत. या कार्यक्रमास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्यासह शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते, अशी माहितीही दानवे यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरात आज सामुहिक राष्ट्रगायनाचा कार्यक्रम होता. यावेळी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, नाशिक महानगर पालिका आणि जिल्हा परिषद यांच्या वतीने संयुक्तरित्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सामूहिक राष्ट्रगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, याच कार्यक्रमामधी दानवेंचा एक फोटो सध्या सोशल मिडियात व्हायरल होत असून पाऊस सुरू झाल्यानंतर विद्यार्थी पावसात भिजत उभे आणि मंत्री दानवे हे स्टेजवर छत्रीमध्ये उभे दिसत असल्याने त्यांना सोशल मिडियावर चांगलेच ट्रोल केलं जात आहे. या फोटोमध्ये दानवेंसाठी एक व्यक्ती छत्री घेऊन उभा दिसत असून दानवे तिरंगा हातात घेऊन उभे दिसत आहेत. दरम्यान विद्यार्थी भरपावसात भिजत आहेत. यामुळे दानवेंना ट्रोल केलं जात आहे.
दरम्यान, पाऊस सुरू झाल्यावर सुद्धा आपले भाषण न थांबवता सुरू ठेवल्याने २०१९ साली राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना निवडणुकीत मोठी फायदा झाला होता. यानंतर पाऊस सुरू झाल्यानंतर भरपावसात सभा घेणारे अनेक नेतेमंडळी दिसले. मात्र, आज दानवे यांनी विद्यार्थी समोर असतांना स्वत: छत्रीत उभे राहिलेले अनेकांना आवडले नसल्याने त्यांना ट्रोल केलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.