MLA Kishor Patil News, Eknath Khadse News, Jalgaon News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

खडसेंची बुंदी संपली; बंडखोर चंद्रकांत पाटील यांनी बुंदीचे लाडू वाटले!

मुक्ताईनगर येथे बंडखोर आमदार चंद्रकांत पाटील यांची मिरवणुक काढण्यात आली.

Sampat Devgire

मुक्ताईनगर : राज्यातील (Mahavikas Aghadi) सत्तांतर नाट्यानंतर विधानभवनामध्ये दोन दिवसीय अधिवेशन पार पडून शिंदे गटातील मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) गुरुवारी मतदारसंघात परतले. त्यांनी येथील मुक्ताई मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर प्रवर्तन चौकात जमलेल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. (BJP leaders greet Shivsena rebel Chandrakant Patil at Muktainagar)

चौकातील शाहू, फुले, डॉ. आंबेडकर या महापुरुषांच्या स्मारकांना त्यांनी माल्यार्पण केले. यानंतर मिरवणुकीद्वारे घराकडे त्यांचे प्रस्थान झाले. मिरवणुकीत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. यातून अप्रत्यक्षरीत्या त्यांच्याकडून शक्तिप्रदर्शन झाले.(Jalgaon Latest Marathi News)

भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदू महाजन, माजी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, भाजपचे विधानसभा क्षेत्रप्रमुख ललित महाजन त्यांच्यासह असंख्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.(Eknath Khadse News in Marathi)

याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, नवनीत पाटील, जीवराम कोळी, भागवत कोळी, शिवाजी पाटील, शहरप्रमुख प्रशांत टोंगे, राजेंद्र हिवराळे, गोपाळ सोनवणे, ब्रिजलाल मराठे, महेंद्र मोंढाळे, विनोद पाटील, मोहन बेलदार, सुधीर कुलकर्णी, सूरज परदेशी, शांताराम कोळी, छोटू पाटील, दीपक माळी यांच्यासह शिवसेना भाजप पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक कार्यकर्ते मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.

उपहासात्मक बुंदीचे वाटप

गेल्या काही दिवसांपासून चंद्रकांत पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले माजी मंत्री खडसे यांनी विधान परिषदेत उमेदवारी ते निवडून येईपर्यंत त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून भावी मंत्री होण्याचे होर्डिंग लावले होते. परंतु एका रात्रीत राज्याच्या राजकारणातील चित्र बदलल्याने सोशल मीडियामध्ये पंगत बसली आणि बुंदी संपली हा चर्चेचा विषय झालेला होता. हाच धागा पकडून चंद्रकांत पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जमलेल्या हजारो लोकांना चहा व नाश्त्याची व्यवस्था केली होती. सोबतच बुंदी वाटप करून विरोधकांना उपहासात्मक चिमटा काढल्याचे बोलले जाते.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT