MLA Suhas Kande News, Nashik News in Marathi  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Suhas Kande : माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या, मी राजीनामा देतो ; कांदेंचं ठाकरेंना थेट आव्हान

कांदे आज आदित्य ठाकरेंची 5 हजार कार्यकर्त्यांसह भेट घेणार आहेत. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले लागले आहे.

सरकारनामा ब्युरो

नाशिक : शिवसेनेतील गळती रोखण्यासाठी राज्याचे माजी पर्यटन मंत्री,युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. ठाकरेंची शिव संवाद यात्रा नाशिकमध्ये (Aaditya Thackeray in Nashik) धडकणार आहे. (Suhas Kande latest news)

या दौऱ्यात बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) हे आज आदित्य ठाकरेंना भेटणार असल्यामुळे नाशिकचं राजकारण तापलं आहे.

आज (शुक्रवार) कांदे आदित्य ठाकरेंची 5 हजार कार्यकर्त्यांसह भेट घेणार आहेत. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले लागले आहे. सुहास कांदे यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशामुळेच एकनाथ शिंदे यांना सुरक्षा व्यवस्था नाकारण्यात आली असल्याचा गौप्यस्फोट सुहास कांदे यांनी केला आहे.

पुन्हा निवडणुकीला सामोरे जातो..

"आमचे नेते एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांची धमकी आलेली असताना त्यांना सुरक्षा न देण्यासाठी वर्षावरुन फोन केला गेला," असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे. "माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या. मी तातडीने राजीनामा देतो आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जातो," असे थेट आव्हान कांदेंनी आदित्य ठाकरेंना दिले आहे.

'माझं काय चुकलं'

आदित्य ठाकरे यांना नाशिक दौऱ्यात कांदे (Suhas Kande) निवेदन देणार आहे. यात ते 'माझं काय चुकलं' या आशयाखाली मतदारसंघातील कामांची यादी आणि हिंदुत्व या विषयावरून शिवसेना कशी दूर गेली याबाबतचा उल्लेख त्यांनी निवेदनात केला आहे.

पालघर साधूंचे हत्याकांड, सावरकरांच्या बाबतीतील भूमिका, असे अनेक प्रश्न ते उपस्थित करणार आहेत.यात नवाब मलिक जेलमध्ये असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही, भुजबळांनी त्रास दिला तरी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे, हे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT