Police
Police Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

दंगलखोरांकडून नुकसानीची भरपाई वसूल करा!

Sampat Devgire

नंदुरबार : अक्कलकुवा (Nandurbar) येथील दंगलीची चौकशी होऊन नुकसान करणाऱ्या जमावाकडून भरपाई वसूल करण्यात यावी. तसेच दंगलखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (MNS) करण्यात आली आहे. याविषयी पोलिस (Police) अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. (MNS deemands Police to recover compensation od akkalkuwa riot)

निवेदनात म्हटले आहे, की अक्कलकुवा येथील दंगल घडविण्याचा पूर्वनियोजित कट असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. रात्रीच्या समयी झोपेत असलेल्या निरपराध नागरिकांवर हल्ला करणाऱ्या समाज कंटकांवर, गांवगुंडावर पोलिसांनी कठोर कार्यवाही करुन ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे, त्या नागरीकांना दंगलखोरांकडुन वसुली करुन भरपाई द्यावी, दिल्लीच्या एका घटनेचा अक्कलकुवा येथील शांतताप्रिय नागरिकांचा काहीही संबंध नसताना सुनियोजित पद्धतीने कट करुन हल्ला करण्यात आला.

तीन दिवस सुरु असलेल्या या अशांततेमुळे नागरिक भयभीत झाले असून दंगलखोरांनी दहशत माजविण्याचा जो प्रयत्न केला तो निंदणीय आहे. दंलखोरांच्या जमावाने अनेक नागरिकांच्या वाहनांची, घरांची, दुकानांची तोडफोड करुन लूटमार करण्याचे प्रकार केल्यामुळे अक्कलकुवासह जिल्ह्यात भितीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी या दंगलखोरांचा कसून शोध घेऊन या मागे असलेल्या परकीय शक्तींना शोधून काढावे.

ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे, त्या दंगलग्रस्त नागरीकांना दंगलखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करून द्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनील कोकणी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जोशी, उपशहराध्यक्ष राम ठक्कर आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT