Sinner Bus stand Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation Nashik News : बससेवा बंद, शिर्डीच्या भाविकांची संख्या घटली!

Sampat Devgire

Maratha Agitaion Nashik : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून ग्रामीण भागात आंदोलन अतिशय वेगाने पसरत आहे. सिन्नर तालुक्यात पूर्व भागात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. (MSRTC Shirdi traffic as well many services affected due to Maratha agitation)

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मोठा प्रभाव सिन्नर (Sinner) तालुक्यात झाला आहे. बंदमुळे अनेक सेवांवर परिणाम झाला आहे. विशेषतः एसटी (MSRTC) बसेसच्या सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज सकाळी पुण्याहून येणाऱ्या बसेस सिन्नर आगारात उभ्या करण्यात आल्या. कोपरगावची सेवा बंद करण्यात आली. सिन्नरच्या पूर्व भागातील अनेक गावांत कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. त्यामुळे शिर्डी- सिन्नर महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. सिन्नर शहरात सुरू असलेल्या आंदोलनातील कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या निषेधार्थ मुंडन केले.

न्यायडोंगरी (नांदगाव), इगतपुरी, पिंपरी हवेली, लखमापूर (दिंडोरी), निफाड, वडांगळी येथे साखळी उपोषण सुरू करण्यात आले. धुळगावला अन्नत्याग आंदोलन सुरू झाले. डॉक्टरवाडी येथे रॅली काढून जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यात आला. त्यामुळे ग्रामीण भागात मराठा आरक्षणाचे आंदोलन अतिशय वेगाने पसरू लागल्याने पोलिसांच्या चिंतेत भर पडली आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा सुरू केलेल्या उपोषणाला आठवडा होत आहे. त्यामुळे या आंदोलनाच्या तीव्र प्रतिक्रिया ग्रामीण भगात उमटल्या आहेत. सिन्नरहून जाणारी नाशिक- शिर्डी, कोपरगाव, पुणे यांसह नाशिकची शहर बससेवा बंद करण्यात आली आहे.

आंदोलनामुळे अनेक प्रवाशांनी बस स्थानकांमध्ये गर्दी केली आहे. महानगरपालिकेच्या सिटी बस ही बंद झाल्याने नाशिक सिन्नर कोपरगाव शिर्डी तसेच ग्रामीण भागात बसेस नसल्याने विद्यार्थी, नागरिकांची गर्दी स्थानकावर आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT