Rupali_Chakankar & Rohini Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohini Khadse Politics: रोहिणी खडसे यांनी रूपाली चाकणकर यांची योग्यताच काढली, म्हणाल्या, त्या पदाला पात्र नाही!

Rohini Khadse; Rohini Khadse attacks again, Rupali Chakankar is not fit to be the chairperson of the Women's Commission-रूपाली चाकणकर या महिला आयोगाचा उपयोग आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी करतात

Sampat Devgire

Chakankar Vs Khadse news: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीचे अध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप झाले. रोहिणी खडसे यांनी चाकणकर यांची योग्यताच काढली. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यात आरोप प्रत्यारोप नवे नाहीत. मात्र आता त्याला नव्याने तोंड फुटले आहे. त्याला निमित्त ठरले आहे खडसे यांच्यावर एका महिलेने केलेले आरोप.

श्रीमती खडसे यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि त्यांच्या पत्नी सीमानापुढे यांच्यात कौटुंबिक वाद आहे. या वादातून श्रीमती नाफडे यांनी पोलिसात आपल्या पतीविरोधात तक्रार केली आहे. पती-पत्नीच्या या वादात राजकीय संधी म्हणून रोहिणी खडसे यांनाही गोवण्याचा प्रयत्न झाला.

जळगावच्या या घटनेची कोण कोण लागतात महिला आयोगाचे अध्यक्ष चाकणकर यांनीही संधी साधली. यांनी लगोलग जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी श्रीमती नाफडे यांचे आवर्जून भेट घेतली. यावेळी चाकणकर यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत नाकोडे यांनी रोहिणी खडसे यांचे समर्थक आपल्याला दमबाजी करतात असा दावा केला.

यावरून खडसे आणि चाकणकर यांच्यात चांगलीच राजकीय खडाजंगी सुरू आहे. रूपाली चाकणकर या आपल्या पदाचा राजकारणासाठी वापर करतात. पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी आणि मदत करण्यासाठी त्या घटत असतात. त्यामुळे त्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी लायक नाहीत. त्यांच्याकडे ती पात्रता नाही. त्यामुळे चाकणकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खडसे यांनी केली.

श्रीमती नाफडे यांच्या वादाशी आपला काहीही संबंध नाही. श्रीमती नाफडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत माझा कुठेही उल्लेख नाही. मात्र चाकणकर यांनी आपल्या दौऱ्यात नाफडे यांना आपले नाव घेण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच श्रीमती नाफडे यांनी माझे नाव घेतले आहे. या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्यास आपण तयार असल्याचे श्रीमती खडसे यांनी सांगितले.

या निमित्ताने पुन्हा एकदा महिला आयोगाचे अध्यक्ष चाकणकर आणि श्रीमती खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोप सत्र सुरू झाले आहे. यावेळी श्रीमती खडसे यांनी पुन्हा एकदा श्रीमती चाकणकर यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. चाकणकर यांनी त्याला रोखठोक प्रत्युत्तर देताना, श्रीमती खडसे यांनी माझी काळजी करू नये. मी महिला आयोगाने काय करावे, आणि त्याची जबाबदारी काय याबाबत सक्षम असल्याचे म्हटले आहे.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT