BJP Leader Rohit Kundalwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics: धक्कादायक, कर्ज दिले ५ लाख, वसूल केले ८० लाख, भाजप नेत्याची कमाल!

Rohit kundalwar; BJP leader who was a money lender recovered Rs 80 lakhs from Rs 5 lakhs-खाजगी सावकारी करणाऱ्या भाजप नेत्याने बेधडक कायद्याला धाब्यावर बसवत थेट कायदाच हातात घेतला.

Sampat Devgire

Kailash Kundalwal News: भाजप नेता आणि खाजगी सावकार कुंडलवाल याच्या अनेक धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. व्याजाने पैसे दिल्यावर त्याची पठाणी वसुली सुरू होती. यामध्ये त्याने विनयभंगांपासून तर अनेक गुन्हे केल्याचे ओउघडकीस आले आहे.

गेल्या आठवड्यात भारतीय जनता पक्षाच्या युवा आघाडीचा नेता असलेल्या रोहित कुंडलवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील कापड व्यापाऱ्याला दिलेल्या कर्जापोटी अवाजवी व्याजाची वसुली करण्यात येत होती. त्यासाठी व्यापाऱ्याच्या मुलीचा विनयभंग देखील झाला होता. व्यापाऱ्याच्या पत्नीला देखील अशाच प्रकारे पिस्तुलाचा धाक दाखविण्यात आला होता. या प्रकारामुळे शहरात ओएकच खळबळ उडाली.

या प्रकरणानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. जनतेने ओआपल्या तक्रारी पोलिसांना कळवाव्यात कोणत्याही दडपणाला बळी न पडता थेट पोलीस आयुक्तांची संपर्क केला तरी त्याची दखल घेतली जाईल, असे त्यांनी कळविले आहे. त्यामुळे पोलिसांकडे आणखी काही तक्रारी आल्या. त्यातील प्रकार अक्षरशः चक्राऊन टाकणारा आहे.

धास्तावलेल्या व्यापाऱ्याने शहर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला होता. संबंधित भाजप नेत्याने अनेकांना धमकावले असल्याचे पुढे आले आहे. यामध्ये तक्रार देण्यास पुढे येणाऱ्यांनी आपले नाव गोपनीय ठेवण्यासाठी पोलिसांना विनंती केली आहे.

भाजप नेता कुंडलवाल याच्याबरोबरच त्याचे वडील कैलास कुंडलवाल हे देखील गेले २६ वर्ष हा व्यवसाय करीत आहेत. यामध्ये त्यांनी पंचवटीतील एका व्यापाऱ्याला पाच लाख रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जापोटी त्यांनी संबंधित कर्जदाराच्या पत्नीच्या नावे असलेली जमीन गहाण म्हणून घेतली होती. या जमिनीचे त्याने आपल्या आईच्या नावाने मुक्त्यारपत्र केले होते. संबंधित व्यापाऱ्याची भुत्याने (चांदवड) येथील अन्य जमीन देखील स्वतःच्या नावे करून घेतली.

कुंडलवाल याने पाच लाख रुपये कर्ज दिले होते. त्याबद्दल त्याने भरमसाठ व्याजाची वसुली केली. तसेच व्यापाऱ्याच्या दोन ठिकाणच्या जमिनी हडप केल्या. त्यासाठी त्याने चक्क व्यापाऱ्याच्या मुलांचे अपहरण केल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलांना धमकावणे, जीवे मारण्याची धमकी आदी प्रकार केले.

एवढ्या भरमसाठ प्रमाणावर व्याजाची पठाणी वसुली क्वचितच आढळते. सत्ताधारी पक्षाशी संबंध आणि वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद याशिवाय हे घडू शकत नाही, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. हा सर्व धिंगाणा सुरू असताना विविध यंत्रणांच्या पाठिंब्याच्या जोरावर ज्याने कर्ज घेतले त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे काम कुंडलवाल यांनी केले आहे. त्यामुळे ही धक्कादायक बाब सध्या राजकीय कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे.

---------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT